Atul Save I मंत्री अतुल सावे ॲक्शन मोडवर

 

इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला

मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली.

मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून सावे यांनी मंत्रलायातील पाचव्या मजल्यावर पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर तत्काळ अपारंपरिक विभागाचा आढावा घेतला. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेतली व योजनांची पूर्तता करण्यासाठी सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांत या योजनांना गती देण्यात येईल, असे मंत्री सावे म्हणाले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *