इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRF) इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

दिल्ली (विशेष प्रतिनिधी) –

रस्ता सुरक्षा, आधुनिक रस्ते विकास आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसाठी कार्य करणारी अभियंत्यांची जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित संस्था इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRF) इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपुत्र, प्रख्यात अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे शिल्पकार इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. (Dr. Anilkumar Gaikwad)

त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक स्तरावर भारताच्या पायाभूत सुविधा विकासाला नवी दिशा देणारे अभियंता म्हणून डॉ. गायकवाड यांची ओळख निर्माण झाली आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात अशक्य वाटणारे प्रकल्प साकारण्याची क्षमता असलेले इंजि. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी देशात अनेक ऐतिहासिक आणि विक्रमी प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील “मिसिंग लिंक” प्रकल्प हा जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून प्रसिद्ध झाला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे. या अभूतपूर्व अभियांत्रिकी कार्याबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता.

इंजि. डॉ. गायकवाड यांच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि भव्य प्रकल्प पूर्ण झाले आहेत. दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, मुंबईतील प्रतिष्ठित बांद्रा-वर्ली सी लिंक, वैतरणा नदीवरील सर्वात उंच लोखंडी पूल, मुंबई मंत्रालयाचे नूतनीकरण, मुंबई उच्च न्यायालयाचे नूतनीकरण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, तसेच मुंबई-पुणे मिसिंग लिंक यांसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली साकार झाले आहेत.

रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बोगदे, पूल आणि आधुनिक अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य हे आज देशासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. त्यांच्या दूरदृष्टी, उत्कृष्ट नेतृत्व, तांत्रिक कौशल्य आणि विकासाभिमुख विचारांची ही निवड मोठी पावती मानली जात आहे.

इंटरनॅशनल रोड फेडरेशन (IRF) इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी आणि जनतेकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतातील रस्ते विकास आणि आधुनिक पायाभूत सुविधा क्षेत्राला नवी गती आणि जागतिक ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

त्यांना या ऐतिहासिक निवडीबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील उज्ज्वल कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *