Mumbai Police | मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांचा उत्कृष्ट निवडणूक कामगिरीबद्दल गौरव

मुंबई पोलिसांच्या निवडणूक कक्षात कार्यरत असताना सन २०२५ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता कालावधीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानपूर्व तयारी, टपाली मतदान प्रक्रिया, मतदान दिवशीचा बंदोबस्त आराखडा तसेच मतमोजणी बंदोबस्त आराखडा या सर्व कामांची त्यांनी कौशल्यपूर्ण आणि प्रभावी हाताळणी केली. (mumbai police dyanesh yedge)

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यात दिलेल्या योगदानाची दखल घेत मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या गौरवाबद्दल पोलिस दलातून तसेच सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *