सैनिकांच्या न्याय व हक्कासाठी विधान सभा लढवणार
माजी सैनिक प्रशांत कदम कराड विधानसभा निवडणुकीसाठी भरणार अर्ज
कुलदीप मोहिते कराड सातारा
सर्व आजी-माजी सैनिक यांच्या न्याय व हक्कासाठी विधानसभा लढवणार असल्याचे सैनिक फेडरेशन अध्यक्ष सातारा माजी सैनिक प्रशांत कदम यांनी लोकशासक न्यूज नेटवर्क शी बोलताना सांगितले .पुढे ते म्हणाले ही लढाई ही कोणाच्या विरोधात नाही ना सत्तेसाठी न स्वार्थासाठी फक्त सैनिक त्याचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबिय,शेतकरी, बहुजन,युवा वर्ग, तुमच्या हक्कासाठी आहे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांना अनेक वेळा सैनिकांच्या समस्या व मागण्या विषयी सतत भेटून निवेदने देऊन अवगत केल शहीद जवानांच्या शहीद दिवसाला बोलवले, शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी सुद्धा बोलावले परंतु या राजकीय मंडळींना सैनिकांच्या साठी वेळ नाही त्यांनी कायमच जाणून बुजून या सर्व बाबींना बगल दिली दुर्लक्ष केले म्हणून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना सैनिकांची, शेतकऱ्यांची, बहुजनांची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे आता नाही तर कधीच नाही जर आपण निवडून आलो नाही तरी पाडण्याची ताकद ही आपल्या मता मध्ये आहे व येणाऱ्या काळात कोणतेही सरकार असो सर्वांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करेल यासाठी आपली ही लढाई आपल्या हक्कासाठी आहे तरी सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय , शहीद जवान कुटुंबीय, शेतकरी, बहुजन, युवा वर्ग,महिलावर्ग यांनी बहुसंख्येने या रॅलीसाठी उपस्थित राहावे अशी विनंती कराड विधानसभेचे अपक्ष उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी केली आहे.
माजी सैनिक प्रशांत कदम यांचा विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज मंगळवार दि.29/10/2024 रोजी भरण्यात येणार आहे दरम्यान सकाळी 10:30 वाजता शहीद विजय दिवस चौक कराड येथे सर्व सैन्य दलातील व प्यारा मिलिटरी फोर्स मधील आजी/माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय शेतकरी, बहुजन, युवा वर्ग,यांनी उपस्थीत
राहण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
रॅली ची मार्ग पुढील प्रमाणे असेल विजय दिवस चौक कराड टाऊन हॉल (कराड बस स्टॅन्ड जवळ) येथून विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना स्मरण करून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत तसेच: सर्व सैनिकांनी रॅलीसाठी येताना कॅप, कोट, मेडल परिधान करून येणे ही विनंती ही माजी सैनिक प्रशांत कदम यांनी यावेळी केली आहे.