गोव्याचे कास पठार
साद निसर्गाची
लेखन स्त्रीग्धरा नाईक
संकलन कुलदीप मोहिते
थोरा मोठ्या पासून लहान मुलांना आपल्या रंग व सुगंधाने आकर्षित करणारे जैवविविधतेतील एक महत्त्वाचा घटक काही फुले नित्याने बहरतात,काही फुले मोसमी असतात तर काही फुले कित्येक वर्षानंतर फुलतात, यंदाच्या वर्षी पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेत फुललेले करवी हे असेच एक फुल. गडद जांभळ्या रंगाचे, मध्यम आकाराचे हे फुल तब्बल सात वर्षांनी फुलते. यंदाच्या वर्षी चोर्ला घाटात फुललेली करवीची फुले पर्यटकांना भुरळ घालत आहेत. करवी फुलाचे सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आम्हीही चोर्ला घाटाची वाट धरली. निसर्ग भ्रमंतीसाठी आम्ही भल्या पहाटे बाहेर पडलो. निरव शांतता दाट धुके , पक्षांचा नुकताच सुरू झालेला किलबिल लाट, शुद्ध हवा व झाडांच्या फांद्यामधून वाट काढू पाहणाऱ्या सूर्यकिरणांच्या आनंद लुटत आम्ही पदभ्रमण करत निसर्गाचा निळा जांभळा गलिच्छ पाहण्यासाठी निघालो.
स्ट्रॉबेला थीम्स कॅलोसा म्हणून ओळखली जाणारी करवी फक्त पश्चिम घाट आणि द्विकल्पीय भारतातच आढळते, गुलाबी, जांभळ्या, निळ्या रंगाने व्यापलेला चोर्ला घाट पाहायला अत्यंत सुंदर दिसत होता भरपूर फुले व ज्या त्या फुलांमधील मधुर रसाचा आस्वाद घेत स्वच्छंदपणे विहार करणारी रंगबिरंगी फुलपाखरे हा नजारा पाहण्याजोगा होता
गोव्याला कर्नाटक राज्याशी जोडणारा चोर्ला घाट हा जैवविविधतेने समृद्ध असलेला प्रदेश. दर्या खोऱ्यातून वाट काढत उंच कोसळणारे दुधाळ धबधबे या घाटातील प्रमुख आकर्षण. येथे सात वर्षांनी फुललेली करवी ही यंदाच्या वर्षी पर्यटकांसाठी आकर्षण ठरत होती कीटक, पक्षी, मधमाशा इत्यादींना आकर्षित करून या प्रदेशाची जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी मदत करते.
घाट परिसरातील लोक करवी फुलण्याची मोठ्याआतुरतेने वाट पाहत असतात असे समजले व त्याचप्रमाणे कारण समजून घेण्यासाठी येथील गावातील लोकांशी संवाद साधला मधमाशांच्या पोळ्यातील मध काढून विकणे हा येथील लोकांचा पारंपारिक व्यवसाय. करवी फुलल्यानंतर या परिसरात विशिष्ट प्रकारच्या मधमाशा पाहायला मिळतात असे येथील ग्रामस्थांनी सांगितले, ह्या मधमाश्या एरवी आढळणाऱ्या मधमाशांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. करवी भरते त्या काळात मधमाशांची संख्या वाढल्याने मधाचा साठाही वाढतो त्यामुळे जास्त नफा मिळतो असे स्थानिकांनी सांगितले. हे मध पौष्टिक आणि औषधी गुणधर्मयुक्त असते. करवीच्या फुलण्याने आदिवासी जंगल निवासीच नव्हे तर पशुपक्षीही सुखावतात. करवीच्या झुडपांची पाने गवे रेडे अतिशय आवडीने खातात. करवी चा रस कुष्ठरोग व खरुज घालवण्यास उपयुक्त ठरतो. काही कारणास्तव शरीरावर सूज आली असेल तर ती कमी करण्यासाठी करवीचा रस उपयुक्त आहे असेही यावेळी ग्रामस्थांकडून समजले.
डोंगराच्या कडेला किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करवीची झुडपे फुलली असल्याकारणाने पदभ्रमण करणे शक्य नसलेल्या व्यक्तींना देखील घाटमाथ्यावर बहरलेल्या रंगबिरंगी फुलांचा आनंद लुटू शकतात. घाटमाथ्यावर पदभ्रमण करण्यासाठी जाताना अंगाला जळू लागण्याची भीती असते. जळू म्हणजे जंगलात फिरताना अंगावर पडून रक्त पिणारा जीव हा जीव विषारी नसला तरी तो अंगार पडून आपल्या चावल्यास त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात जळू चावण्यापासून रोखण्यासाठी आपण इन्सेक्ट रोपेलन्ट क्रीम किंवा मिठाचा वापर करू शकतो.
जांभळ्या, निळ्या गुलाबी रंगाच्या व्यतिरिक्त यंदा पांढऱ्या रंगाची करवी फुलल्याचे पर्यावरण अभ्यासकांच्या निदर्शनास आले. उत्प परिवर्तनामुळे एरवी फुलणाऱ्या फुलांपेक्षा वेगळ्या रंगाची फुले फुलण्याचा निष्कर्ष संशोधक काढत आहेत.
करवीचा जीवनकाळ आठ वर्ष असतो. बहर वसरला की ह्या झुडपाला फळ येतात मग पुढील मान्सूनच्या काळात ही फळे जमिनीवर पडून करवीची बियाणे उगवण्याची प्रक्रिया सुरू होते. करवी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते. प्रत्येक वर्षी पावसाच्या आगमनानंतर या वनस्पतीला पाने येतात. पण ती फुलत नाही दरवर्षी पावसाळा संपला की पाने गळून केवळ शिल्लक खोड राहते. ही प्रक्रिया पूर्ण होऊन करवी परत फुले पर्यंत सात वर्ष उलटून जातात.
करवीचे झुडुम सात वर्षानंतर एकदा भरते, बियाणे तयार करते व निसर्गातील बऱ्याच गोष्टी जिवंत करत स्वतः मरून जाते. सात वर्षाच्या प्रदीप कालखंडानंतर पुन्हा एकदा फुलण्यासाठी,/
लेखिका विद्युत अभियांत्रिक प्राध्यापिका आहेत