Be proud of the country but save the constitution
Be proud of the country but save the constitution

देशाभिमान बाळगा पण संविधान ही वाचवा !!

नागपूर:- प्रविण बागडे

भारताला या ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. या मागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभागआहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.

29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने बाबासाहेबांना कसले ही सहकार्य केले नाही, उलट बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला. 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवसाच्या कालावधी नंतर हा मसुदा अंतिम केला. एकटया बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करतांना त्यांनी कल्पनातीत परिश्रम घेतले व जी असामान्य बुध्दीमत्ता प्रगट केली ती खरोखरच संस्मरणीयच म्हणावी लागेल, यात शंका नाहीच. बाबासाहेबांमुळेच भारतीय राज्यघटना जगमान्य झाली. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी समर्पित करुन लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय दिन म्हणुन 26 जानेवारी ला साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलेली स्वतंत्र सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक भारताची नवी राज्यघटना नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारतीय घटनेचे एक महान शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा भारत देशाने स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे जनतेसाठी, जनतेचे व जनतेने चालविलेल्या राज्यांचे तत्व अंतर्भूत केले आहे. ती घटना जर दीर्घकाळपर्यंत टिकावी अशी आपणांस इच्छा असेल तर आपणापुढे जी संकटे वाढून ठेवलेली आहेत, ती समजून घेण्यास आपण विलंब लावता कामा नये. तसेच त्याचे निराकरण करण्यास असमर्थ राहता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच मार्ग आहे असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे विविध देशभक्तीपर मनोरंजनाचे प्रेरणादायक असेकार्यक्रम आयोजित केले जातात‌.

महात्मा गांधींनी भगवान गौतम बुध्दाच्या तत्वज्ञानानुसार शांती व अहिंसेच्या मार्गाने लोकांना जागृत करुन देशात रक्तविहीन क्रांती केली, ही मोठी शक्ति गांधीजींच्या रुपात पाहायला मिळाली. गांधीजींच्या हाकेवर अनेक असाधारण लोक जमा झाले व त्या सगळयांच्या मदतीने स्वातंत्र्य लढा जिंकला. पं. जवाहरलाल नेहरु यांनी स्वातंत्र्य भारताला लोकशाहीमुल्ये रुजविण्यासाठी नवी दृष्टि दिली. देशाचा आर्थिककणा मजबूत व्हावा यासाठी त्यांनी पंचवार्षीक योजनेला दिले, त्याची फळे आज आपण चाखत आहोत.

            आधूनिक भारताच्या जडणघडणीत काँग्रेसपक्षाने महत्वपूर्ण भूमीका बजावली आहे. सतत धर्मनिरपेक्षतेची कास धरुन कार्य केले. गरीबांच्या हक्काच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारा काँग्रेस हा एकमेव पक्षआहे. ब्रिटीशांच्या जुलमी जोखडातून देशवासीयांना सोडविण्याचे सामर्थ्य केवळ काँग्रेस पक्षातच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर दैदिप्यमान काम करणाऱ्या या पूर्वजांनी सोपविलेला वारसा जोपासने आणि देशाला जगात अत्युच्य शिखरावर पोहचविण्याची सामाजिक आर्थिक व खाजगी स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महत्त कार्य काँग्रेस कडून घडले, देशातील प्रत्येक नागरिकाला याची जाण आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास केवळ आपल्यासाठीच नव्हे तर देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही पक्ष काँग्रेस असल्याबाबतचा कृतार्थ अभिमान आम्हाला आहे. धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्यता हे आमचे सुत्र राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही जागतिक मंदीतही आर्थिक विकासाकडे मजल मारु शकलो हे काँग्रेसपक्षाच्या यशाचे गमक आहे. देशाला ब्रिटीशाच्या जुलमी विळख्यातून सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर होती, ध्येयवेडे होऊनच आम्हाला ते साध्य करता आले.

               जागतीक घडामोडीमध्ये याच काळात भारताच्या शब्दाला महत्व प्राप्त होऊ लागले. तद्नंतर दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे योगदान देशासाठी अनन्य साधारण महत्व होते. त्यांनी त्यांच्या काळात हरीतक्रांतीच्या माध्यमातून “गरीबी हटाओ” चा नारा देत जनसामान्याच्या आवाजाला हुंकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडलेल्या आर्थिक धोरणानूसार 20 कलमी कार्यक्रम राबवून या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित केली. त्यानंतर दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी पाहिलेले 21 व्या शतकाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भारताचे स्वप्न साकार केले, याचे संपूर्ण श्रेय दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जाते. भारतातील काना कोपऱ्यात केलेला प्रवास, त्या भागातील प्रश्न आणि प्रत्येक भारतीयास समजुन घेण्याची त्यांची तळमळ यातूनच त्यांनी देशातील तरुण-तरुणींना पूढे आणले, हे विसरता येणे शक्य नाही, यामुळे देश प्रगल्भ अवस्थेत आहे.

15 जानेवारी 1849 रोजी लेप्टनंट जनरल करिअप्पा हयांनी ब्रिटीश जनरल कडून कार्यभार स्वीकारला होता. हा दिवस देशभरात भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाचा गौरव विशेष म्हणजे 15 जानेवारी 2025 रोजी 76 वर्ष पूर्ण झालीत. या 76 वर्षाच्या इतिहासात भारतीय थलसेनेने असामान्य धैर्य, साहस, पराक्रम गाजवित भारत मातेच्या सीमेचे रक्षण केले. तसेच देशावर झालेल्या शत्रूंच्या आक्रमणा विरुध्द सडेतोड प्रतिउत्तर देवून शत्रूंना पायचित्‍ केले. भारतीय सेना जगात दुसरी मोठी सेना आणि चौथी शक्तीशाली सेना आहे. अशा या बलाढय, साहसी व पराक्रमी थलसेनेचा 76 व्या वर्धापन दिनी भारतीय थलसेना दिवस म्हणुन देशभरात साजरा करण्यात आला.

माजी पंतप्रधान दिवं. डॉ. मनमोहनसिंग यांनी अत्यंत सौम्य आणि संयम ॠषीमुर्तीने सुरळीत शासन चालवतांना नक्षलवाद, आतंकवाद, भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद या सर्ववादांना समुळ नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी उचललेली पाऊले, खरेच देशाभिमान वाटावा अशीच म्हणावी लागेल. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही आदराचे स्थान कमावलेले आहे. आज भारताने जागतिक पातळीवर वेगळीच उंची गाठली आहे. देशाला आज 76 वर्षे पूर्ण झालीत, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या शुभदिनी राष्ट्राची अस्मिता आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी आपण कटीबध्द होऊ या !

कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा…

ये जिंदगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *