कुलदीप मोहिते सडावाघापूर पाटण सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी बहुसंख्य प्रमाणात पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात. […]