नवी दिल्ली : मानव धर्माचा प्रचार करून देशात सद्भावना स्थापन करण्यासाठी देशाच्या राजधानीत ”सद्भावना संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वेद आणि धर्मशास्त्रांत पारंगत असलेले देशभरातील सुमारे ४५० संत—महात्म्यांच्या उपस्थित होणार आहे. यात महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतील 40 संत—महात्म्यांचाही समावेश आहे. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात हा कार्यक्रम होणे आहे. जागतिक ख्यातीचे अध्यात्मिक गुरू आणि उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री श्री सतपाल जी महाराज प्रामुख्याने उपस्थित असतील.
मानव उत्थान सेवा समितीचे व्यवस्थापक महात्मा श्री सत्यबोधानंद यांनी सांगितले की, योगीराज परमसंत श्री हंस जी महाराज यांच्या १२५ व्या जयंतीनिमितत पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात द्विदिवसीय “सद्भावना संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. उच—नीच आणि जाती—धर्माच्या नावावर पडलेली फूट दूर करण्यासाठी मानव धर्माचा अवलंब करण्यास लोकांना प्रवृत्त करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्येश आहे.

मानव उत्थान सेवा समिती मागील ७० वर्षांपासून “मानव धर्म संमेलन’, “राष्ट्रीय एकता संमेलन,” “भारत जागो संमेलन”, “सर्व धर्म संमेलन”, “विश्व शांती संमेलन’ आणि “सद्भावना संमेलन” अशा विविध नावांनी देशभरात कार्यक्रमांचे आयोजित करीत आहे. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणा—या संमेलनात देशभरातून ४५० पेक्षा जास्त संत—महात्म्यांचे आगमण होणार आहे. हे सर्व संत वेद आणि धर्मशास्त्रांमध्ये पारंगत असून मानव धर्म हाच सर्वश्रेष्ट धर्म असल्याचा प्रसार देशभरात करीत आहेत.
राज्याराज्यांतून येणा—या संत—महात्म्यांची माहिती
१) महाराष्ट्र – मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पंढरपूर आणि कोल्हापूरसह २९ शहरांमधून संत येतील.
2) उत्तराखंड – ऋषिकेश, हरिद्वार, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, देवप्रयाग, कालीमठ, गुप्तकाशी, नैनिताल आणि बद्रीनाथसह 28 ठिकाणांहून संतांचे आगमन होणार आहे.
3) मध्य प्रदेश – ग्वाल्हेर, झाशी, उज्जैन, भोपाळ, जबलपूर अशा 18 शहरांमधून संतांचे आगमन होणार आहे.
4) छत्तीसगड – रायपूर, भिलाई, बिलासपूर आणि अंबिकापूरसह आठ शहरांतून संतांचे आगमन होणार आहे.
5) जम्मू-काश्मीर – जम्मू, उधमपूर, डोडा आणि कुपवाडा भागातून संतांचे आगमन होईल.
6) हिमाचल प्रदेश – शिमला, कुल्लू, मंडी, कांगडा आणि लाहौल-स्पिती अशा 11 शहरांमधून संतांचे आगमन होईल.
7) पंजाब – पठाणकोट, होशियारपूर, लुधियाना, भटिंडा, पटियाला आणि चंदीगड येथून अंदाजे 200 संतांचे आगमन अपेक्षित आहे.
८) हरियाणा – कुरुक्षेत्र, अंबाला, गुडगाव आणि भिवानीसह २१ ठिकाणांहून संत येतील.
९) राजस्थान – जयपूर, अलवर, अजमेर, कोटा, उदयपूर, बिकानेर, श्री गंगानगर आणि इतर ठिकाणांहून संत येतील.
१०) गुजरात – गांधीधाम, अहमदाबाद, बडोदा आणि सुरतसह १७ शहरांमधून संत येतील.
११) उत्तर प्रदेश – वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, लखनौ, आग्रा, अलीगड, मथुरा, मेरठ, सहारनपूर, नैमिषारण्य आणि रायबरेली अशा ६७ शहरांमधून संत येत आहेत.
१२) तेलंगणा – हैदराबादहून संत येतील.
१३) आंध्र प्रदेश – विजयवाडा आणि विशाखापट्टणमहून संत येतील.
१४) कर्नाटक – बंगळुरू आणि म्हैसूरहून संत येतील.
१५) गोवा – वास्को द गामा येथून संत येणार…
१६) तामिळनाडू – चेन्नई आणि कोइम्बतूर येथून संत येणार आहेत.
१७) दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील ११ वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून संत येणार आहेत.
