मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा
शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

( कुलदीप मोहिते कराड)
कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ७० किलो वजन गटात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने (shivmudra kaulav sangha)विजेतेपद पटकावले.
३५ किलो वजनगटा पाठोपाठ ७० किलो गटात ही कोल्हापूरने वरचष्मा राखला आहे.
लिबर्टी मजदूर मंडळ(libarty majdur mandal) व रणजितनाना पाटील (ranjeetnana patil) यांच्या वतीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
७० किलो वजन गटात महाराष्ट्रातून एकूण २४ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव या संघाने विजेतेपद पटकावले तर बारामती तालुक्यातील महाराणा क्रीडा मंडळ कळंबने उपविजेतेपद पटकावले. टेंभूच्या रामकृष्ण वेताळ फाउंडेशन संघाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट चढाईसाठी शिवमुद्राचा निलेश बर्गे यास बक्षीस देण्यात आले तर उत्कृष्ट पकडसाठी लिबर्टीच्या निषाद पाटील याला सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू खेळाडूचा किताब कळंबचा सिद्धार्थ कांबळे यास देण्यात आला.
बक्षीस वितरण सलीमभाई मुजावर, सचिन पाटील, युवराज पाटील, जितेंद्र जाधव, दादासाहेब पाटील, किशोर जाधव, विनायक पवार, रणजितनाना पाटील, राजेंद्र जाधव, भास्कर पाटील, मुनीर बागवान सावकार, रमेश जाधव, आशपक मुजावर, जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
बुधवारी पुरुष व्यावसायिक गट आणि खुला महिला गटाच्या स्पर्धा सुरू झाल्या. यात राज्यातील नामांकित खेळाडूंचा सहभाग असून सामने पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड !

लोकशासन news नेटवर्क

कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड!
(कुलदीप मोहिते कराड)
सातारा:वैष्णवी कुंभार हिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा अ मॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व एपी स्पोर्ट्स अकॅडमी आगाशिवनगर ता. कराड ची खेळाडू कु. वैभवी चेतन कुंभार हिने नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अंतर्गत राज्यस्तरीय तायक्वांदो जुनियर चॅम्पियनशिप मध्ये फ्री स्टाईल पुमसे प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले, व तिची जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तिला प्रशिक्षक म्हणून.अक्षय खेतमर यांचे मार्गदर्शन लाभले तर कराड तालुका अध्यक्ष .अमोल पालेकर यांचे मार्गदर्शन बहुमूल्य सहकार्य मिळाले तिच्या या अभिनंदनइय निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन होत आहे . तसेच सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुनील कोडगुले सरचिटणीस .संतोष सस्ते, सचिव .विजय खंडाईत, खजिनदार .गफार पठाण या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नमो चषक 2024

 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

      कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन

 

कुलदीप मोहिते कराड

 

भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

   मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या पाटील, शंकरराव शेजवळ, शैलेश चव्हाण, दादा चव्हाण, शरद चव्हाण, प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना मा. संग्राम बापू भोसले म्हणाले ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी व पुढे हेच खेळाडू भविष्यामध्ये जिल्हा,राष्ट्रीय व राज्यपातीवर खेळण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून नमो चषक कबड्डी 2024 स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघ सहभागी झाले असून जवळपास 80 संघानी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक असे क्रमांक काढले असून प्रत्येक विजयी संघास रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येणार आहे. 70 किलो वजन गट, 55 किलो वजन गट व 65 किलो वजन गटांमध्ये खेळण्यात आलेल्या स्पर्धा आहेत.प्रथम क्रमांक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय धर्यशील दादा कदम, निवडणूक प्रमुख . मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा महाराष्ट्र सचिव रामकृष्ण वेताळ जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष माननीय चिन्मय कुलकर्णी युवा मोर्चा अध्यक्ष माननीय अक्षय भोसले अक्षय पैलवान यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सुनील शिंदे बापू दिपालीताई खोत सीमा घार्गे,महेश चव्हाण, सुदाम चव्हाण, जायसीग चव्हाण, कृष्णतः चव्हाण, विवेक चव्हाण,बापू चव्हाण, शुभम चव्हाण,आबा चव्हाण, गणेश चव्हाण, राम काशीद, संदीप चव्हाण,जयंत पाटील, अजित चव्हाण, सचिन चव्हाण संतोष वांगडे, रामकांत वांगडे आदी मान्यवर उपस्थित होते

IND vs ENG : पहिल्या कसोटी आधीच रोहित शर्माचं विधान चर्चेत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२४ जानेवारी) सुरुवात होणार आहे. (IND vs ENG) मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी ‘बेसबॉल’ची बरीच चर्चा आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) झाल्यानंतर इंग्लंड संघाची खेळण्याची शैली बदलली. इंग्लिश संघ आता कसोटीत झटपट धावा करतो. कोणत्याही परिस्थितीत आक्रमक फलंदाजी करण्याच्या या पद्धतीला ‘बेसबॉल’ असे नाव देण्यात आले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत याबाबत मोठी गोष्ट सांगितली.
रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या ‘बेसबॉल’ दृष्टिकोनाला महत्त्व देण्यास नकार दिला. विरोधी  संघाच्या आकडेवारीकडे लक्ष देण्यापेक्षा आपला संघ कसा खेळतो याकडे आपले लक्ष असल्याचे रोहितने सांगितले. “आम्हाला आमचं क्रिकेट खेळायला आवडेल,” हिटमॅन म्हणाला. विरोधी संघ कसा खेळेल यात मला रस नाही. एक संघ म्हणून आम्हाला काय करायचे आहे यावर माझे लक्ष आहे.”
बशीरसाठी दुःखी: रोहित
याशिवाय इंग्लंडचा अनकॅप्ड खेळाडू शोएब बशीरच्या व्हिसाच्या वादावरही रोहित बोलला. तो म्हणाला, “मला शोएब बशीरबद्दल वाईट वाटते. दुर्दैवाने मी तुम्हाला अधिक माहिती देण्यासाठी व्हिसा कार्यालयात बसत नाही, परंतु मला आशा आहे की तो लवकरच मिळेल आणि आपल्या देशाचा आनंद घेईल.Shoaib Bashir Cricketer)
व्हिसाच्या विलंबाचे निराकरण करण्यासाठी बशीरला ब्रिटनला परत जावे लागले. 20 वर्षीय बशीर अबुधाबीमध्ये संघासोबत होता. तिथे त्याने मालिकेपूर्वी खूप सराव केला. यावर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला, एक कर्णधार म्हणून मला हे विशेष निराशाजनक वाटत आहे. आम्ही डिसेंबरच्या मध्यात संघाची घोषणा केली होती आणि आता बशीरला येथे येण्यासाठी व्हिसा मिळत नाही. हे दुर्दैवी आहे आणि मी त्यांच्यासाठी खूप निराश आहे. बशीर दुर्दैवाने इथे येऊ शकला नाही. (Ben Stokes English cricketer)

कोहलीच्या जागी अनुभवी खेळाडूला संधी का मिळाली नाही?
भारताचा महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी नाव मागे घेतले आहे. बीसीसीआयने त्याला डिस्चार्ज दिला आहे. त्यांच्या जागी रजत पाटीदारला संधी मिळाली आहे. (Rajat Patidar) मात्र, बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अनुभवी चेतेश्वर पुजारा पुनरागमन करू शकेल, असे मानले जात होते. (Cheteshwar Pujara) रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात त्याने द्विशतक झळकावले आहे. याबाबत रोहितला विचारले असता तो म्हणाला की, ‘कोहलीची पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही अनुभवी खेळाडूला परत आणण्याचा विचार केला, पण मग तरुणांना संधी कधी देणार? ते थेट परदेशात उघड होऊ नयेत, अशी आमची इच्छा आहे.

Mumbai festival, Mumbai walk

Mumbai Festival I ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’

 

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे ऑफ इंडिया येथे रात्री ६ ते १० या वेळेत आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांची उपस्थित राहणार आहे.

‘मुंबई वॉक’ हे मुंबई फेस्टिव्हलच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक आहे. या वॉकद्वारे मुंबईची गती कायम ठेवणारे खरे हिरो मुंबईचे डबेवाले, पोलिस हवालदार, बेस्ट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर, सफाई कामगार, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झा, शेफ संजीव कुमार, कपिल शर्मा, अभिनेत्री रकुल प्रीत सिंग यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. गायक अवधुत गुप्ते, पंकज त्रिपाठी, अमृता फडणवीस यांचा संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे.