रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

रिया विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहाराकडून सत्कार

लातूर-(विशेष प्रतिनिधी)

महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि तिचे आई वडिल पल्लवी आणि विजयकुमार गायकवाड यांचा सातकर्णी बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात आला.

पूज्यनीय भंते पाय्यानंद यांनी रियाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रिया नी आपल्या मनोगत व्यक्त केले.ती म्हणाली की परमपूज्यनीय बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारामुळेच मी अमेरिकेला शिक्षणासाठी जाऊ शकले.माझ्या कुटुंबांनी मला सपोर्ट करुन पाठवले म्हणून हे शक्य झाले.आपण ही आपल्या पाल्याना उच्च शिक्षणासाठी देशात आणि परदेशात पाठवावे असे मत रिया नी व्यक्त केले.

कार्यक्रमाला अखिलभारतीय भिक्कू संघाचे कार्याध्यक्ष पुज्यनीय भंते डॉ उपगुप्त थेरो,पुज्यनीय भंते पाय्यानंद,,पुज्यनीय भिक्कू संघ,पांडुरंग अंबुलगेकर,प्राचार्य डॉ गवई,हजारोच्या संख्येनी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

 

 

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज. वि. पवार यांच्या कर्तृत्वावर जागतिक मोहर !

उत्तर अमेरिकेतील ‘आंबेडकराईट असोसिएशनचा’ विशेष पुरस्कार प्रदान !

 

चिपळूण (संदेश पवार यांच्याकडून):

दलित पॅंथरचे सहसंस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कर्तृत्वावर दिनांक 25 मे 2024 रोजी जागतिक मोहर उमटविण्यात आली आहे. नॉर्थ अमेरिकेतील “आंबेडकराईट असोसिएशन ” या संस्थेचा 2024 सालचा विशेष पुरस्कार भारतातील सुप्रसिद्ध लेखक ज. वि. पवार यांना त्यांच्या अनुपस्थितीत देण्यात आला .

 

आंबेडकराईट असोसिएशन ऑफ नोर्थ अमेरिका (AANA ) ही संस्था दरवर्षी सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या एका व्यक्तीस डॉ. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करीत असते. यावर्षी ज. वि. पवार यांनी उद्दीपित केलेल्या चळवळीचा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदेचा तसेच समाज उन्नयनासाठी दिलेल्या जगभरातील व्याख्यानांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला आहे . हा पुरस्कार म्हणजे पवार यांनी प्रगल्भित केलेल्या आंबेडकरवादाचा सन्मान आहे. ज.वी. पवार यांनी आंबेडकरवादाची कधीही कास सोडली नाही. उभे आयुष्य त्यांनी केवळ आंबेडकरवादाची जपणूक केली आहे .

 

ज . वी. पवार यांची ग्रंथसंपदा मराठी, हिंदी, इंग्रजी व भारतातील अनेक प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध झाली असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक त्यांच्या चळवळीवर व साहित्यावर प्रबंध लिहीत आहेत. त्यांच्या कवितांचा आणि ग्रंथांचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आजही ते सतत क्रियाशील असून आंबेडकरवादी चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने अपरांत साहित्य कला प्रबोधिनी या साहित्य विषयक संस्थेचा उदय झालेला आहे. त्यांना मिळालेल्या या जागतिक पुरस्काराबद्दल आंबेडकरी चळवळीतून तसेच समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

SSC Result 2024 I दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

: मुंबई विभागात रायगड जिल्ह्याची बाजी
: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त
: मागील वर्षाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले

रायगड :धम्मशील सावंत

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि.२७) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.८७ टक्के इतके आहे. तसेच मुंबई विभागात रायगड जिल्ह्याने बाजी मारली आहे. मुंबई विभागात एकूण ९५.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल सोमवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ९१३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ७२७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.‌ यामधील ३४ हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार १५९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के इतके आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत १.४७ टक्क्यांनी दहावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ९५.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
…………………
५४.३५ टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण

रायगड जिल्ह्यातील ५४७ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी अर्ज दाखल केले होते. यामधील ५३९ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले. त्यापैकी २९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, २४६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५४.३५ टक्के इतके आहे.
…………………

महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस   दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या नावाने विकतो रवि पाण्डेय -क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट औफिसर

महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस   दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या नावाने विकतो रवि पाण्डेय -क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट औफिसर

 कंप्लेंट केल्यानंतर एग्रीकल्चर ऑफिसर  अमृतसागर यांचे कार्यवाही 40 सॅम्पल सापडले 03 सॅम्पल लॅबकडेे पाठवले सर्व झाल्यानंतर कार्यवाही होणार

सांगली प्रतिनिधी

क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमटेड ही एक किटनसाक दवा बनवणारी कंपनी आहे त्याचा ब्रँड नेम आहे ब्ल्यू कॉपर ५०० ग्रम्स आहे , त्याचा नकल प्रॉडक्ट्स महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस हा दुकान दार नाकल प्रॉडक्ट्स कस्टमर ला विकतो एक कस्टमर नी कंपनी ला कंप्लेंट केला होता त्याचा इंवोईस बिल पण आहे ही सिकायात कंपनी चा अधिकारी रवी पाण्डेय नी agriculture inspector S K AmrutSagar ला दिला आणि ते तिथे जाऊन त्याचा गोडाऊन वर जाऊन कार्यवाही केली तेथे त्यांना ४० पिस सापडला त्यातून inspector ni ३ पीस  सॅम्पल घेतले आणि लॅब मध्ये पटवला सँपल छा रिपोर्ट आला वर त्याचा वर काणूनी करीवाही करणेत येईल

दुकादारांच्या नाव महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस आहे

Pune Accident News I पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशिर्वादाने ?

महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात पुण्याच्या नावलौकिकाला काळिमा फासला

मुंबई, दि. २१ मे २०२४
पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त राखण्यात आली. गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच कोर्टात हजर करुन जामीन मिळाला.

ह्या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, पुणे अपघातातील आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतच्या भरधाव कारने दोघांना चिरडले. वेदांत हा दारुच्या नशेत कार चालवत होता तसेच त्याची पोर्शे ह्या कारला नंबरप्लेटही नव्हती. बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडलेल्या वेदांत अग्रवालला पोलीसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासाठी पिझ्झा, बर्गर मागवल्याचेही समजते. एवढे गंभीर प्रकरण असताना पोलीसांनी तातडीने थातूर मातूर कलमे लावून लगेच कोर्टात हजर केले, पोलिसांनी वेदांतला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.

ज्या पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्या सर्वांना निलंबित करुन कठोर कारवाई केली पाहिजे. हीच तत्परता व विशेष वागणूक इतर नागरिकांना मिळते का ? असा संतप्त सवाल विचारून कायदा सर्वांना समान असतो याचे भानही पोलिसांना राहिले नाही असे लोंढे म्हणाले.

पुणे अपघातप्रकरणी पोलीस कारवाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाग आली व चौकशी करण्याचे निर्देश दिले, हे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा प्रकार आहे.

वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे पण त्याचे कारनामे पाहता त्याच्या वयाकडे पाहण्याची गरज वाटत नाही, त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे. दोन तरुणांचा जीव घेतलेला असताना पोलीसांना त्याचे काहीच कसे वाटले नाही? अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्त आता सांगत आहेत मग पोलीस काय झोपा काढत आहेत का?

महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

खून प्रकरणामधील एका आरोपीस जामीन मंजूर

प्रशांत सकुंडे

मेढा ता. जावली येथे मागील वर्षी म्हणजेच मे २०२३ मध्ये मुंबई वरुण मित्राच्या लग्नासाठी आलेल्या एका तरुणास ७ ते ८ संशयितांनी मारहाण केली होती , या प्रकरणातील तरुणास लाकडी दांडके व हाता पायाने ( लाथा बुक्क्यांनी ) मारल्याचे आरोप संशयित आरोपींवर होते , मारहाणीनंतर सदर जखमी इसमाचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यामुळे सदर प्रकरणामध्ये एकूण ८ ते ९ संशयित आरोपींवर मेढा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन पोलिस प्रशासनाने संशयितांना जून महिन्यात अटक केली होती.
सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक ४ नामे अभिषेक सोनावने याच्यावर मयत इसमास मारहाण केल्याचे आरोप दोषारोप पत्रात होते , सदर आरोपीस मे. सत्र न्यायालयाने अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला असून संशयित आरोपीच्या वतीने ॲड. प्रथमेश बनकर , ॲड. मंजित माने, ॲड. इंद्रजित पाटील यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

Sushma Andhare Helicopter Crash : सुषमा अंधारेंना घेऊन जाण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर कोसळले, अंधारे आणि पायलट सुखरुप

Sushma Andhare Helicopter Crash : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या लोकसभेच्या प्रचारात सक्रिय आहेत. याच अनुषंगाने आज त्या रायगड जिल्ह्यातील महाड इथं प्रचारसभेसाठी आल्या होत्या. एका हेलिकॉप्टरने त्या दुसऱ्या सभेसाठी जाणार होत्या. मात्र, सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. नेमकं कुठल्या कारणामुळं हेलिकॉप्टर कोसळलं याची माहिती पुढे आली नाही. दरम्यान, खुद्द अंधारे यांनीच ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिलीय.

सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणर होत्या. बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत.
हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहे. मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

अंतरंग ललित लेखन पुस्तक सोहळा गोव्यात संपन्न होणार आहे.

लोकशासन प्रतिनिधी गोवा

लेखिका समीक्षा शिरोडकर यांनी अंतरंग ललित लेखन पुस्तक प्रकाशित केले. ५ मे रोजी शिवस्मृती सोंडेकर हॉल साखळीवा येथे संपन्न होणार आहे. गोव्यातील सामाजिक समीकरण नागेश शेट शिरोडकर हे नुकतेच अंतरंग ललित लेखन पुस्तक तयार होणार आहे.

समाजात सध्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नावरती असंतुलित लेखन त्यांनी लिखित स्वरुपात सामाजिक आहे. स्वत: सामाजिक प्रबोधन केले पाहिजे, प्रत्येक युवा लोकाने आपली संस्कृती विचारात घेतले पाहिजे, आपली मायबोली जपली पाहिजे, अशी आपली संस्कृती टिकून आहे असे लेखकांनी गोव्यात शिक्षण दिले पाहिजे आणि स्वत: प्रबोधन लेख लिहिणारी समीक्षा शिरोडकर ही युती आहे. हिने सामाजिक आदर्श निर्माण केला आहे आत्ता तरुण भारत, गोमन दैनिक, हेराल्ड, गोवन वार्तालाप, पुढारी, लोकमत, वंगरभुंय या कोकणी पेपरसाठी विविध लेख आहेत हिने गोवा विद्यापीठ कोकणी मध्ये पदवत्तरचे शिक्षण घेतले आहे व शिवाजी विद्यापीठ मराठी पदव्युत्तरचे शिक्षण आहे. घेतले आहे. मुंबई विद्यापीठातून बी.एड पूर्ण केले आहे गोव्याच्या विविध चळवळीत सहभागी आहे.

सम्राट क्लब मये, साहित्य मंथन सत्तरी, कोकणी सेवा केंद्र साखळी, कोंकणी सेवा केंद्र डिचोली, या विविध सामाजिक संस्था म्हणून त्या काम करत आहेत. सद्द्या मंथन प्रस्तुतची संयोजक म्हणून ती काम करते. त्यांचे पुस्तक प्रकाशन सोहळे प्राचार्य डॉ.भूषण भावे, गोवा कोकणी अकादचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत, गोवा विद्यापीठाचे अध्यक्ष तसेच लेखक व समिक्षक डॉ. हनुमंत चोपडेकर, शिक्षक श्री. समीर प्रभू उपस्थित आहेत. विशेष म्हणजे कोकणीत पुस्तक लिहिण्यासाठी गोव्याचा गौरव केल्याबद्दल राज्यभराची समीक्षा केली जात आहे. समता ही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम भागिही असते. विविध चित्रांचे परिक्षक म्हणून काम केले आहे. तिला राज्य मंत्री मर्यादीत निबंध ब्लॉक बक्षीस प्राप्त आहेत. तसेच विविध चित्रांमध्ये बक्षीसे पटकवले आहेत. विविध कार्यक्रमांचे सुत्रसंचालन केले आहे.

शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ लातूर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे शहर असलेल्या उदगीर येथे प्रियंका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेची जय्यत तयारी सुरु असून संपूर्ण मतदार संघातून मोठया प्रमाणात नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, युवक यासह सर्व समाज घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते यांनी केले आहे.

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना फटका बसला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात मोसमी पाऊस जेमतेम पडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा झाला नव्हता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून बेमोसमी पाऊस पडत आहे. यात वादळी वारे, विजाही पडत आहेत. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे. याचा मोठा फटका शेतक-यांना बसत आहे. वीज पडल्यामुळे आतापर्यत पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच मोठ्या दुधाळ २९ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सहा लहान जनावरे दगावली आहेत. ओढकाम करणा-या दहा जनावरांनाचादेखील वजी पडून मृत्यू झाला आहे. हंगामाच्या तयारीच्या दिवसांमध्ये जनावरे दगावल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे.
या बेमोसमी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. १५ दिवसांत सुमारे ७७० हेक्टर फळबाग पिकांचे नूकसान झाले आहे. यात बहुतांश आंब्याचे नुकसान झाले आहे. ९० हेक्टरपेक्षा अधिक बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर २५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दि. ९ ते १५ एप्रिलपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यात सात दिवसांत २११.९४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई करण्याकरीता ४७.२१ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या बेमोसमी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मागणीही शासनाकडे करण्यात येणार आहे.