ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गायिका कविता उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार

19 व्या मोहम्मद रफी पुरस्काराची मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्याकडून घोषणा

२४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. मान्यवरांच्या हस्‍ते वितरण

 

मुंबई दि. 15 डिसेंबर 2025 : हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणा-या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार तर सुप्रसिध्‍द गायिका उत्तरा केळकर यांना सन 2025 चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज केली.

मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे 19 वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.

रफी यांच्या जयंतीनिमित्त 24 डिसेंबरला दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. गेल्या 18 वर्षात मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.

यावर्षीचे मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करताना आपल्याला आनंद होतो आहे, या दोघांचेही संगीत जगतात मोठे योगदान असून त्‍यांचा सन्‍मान करण्‍याची संधी आम्‍हाला मिळाली याबद्दल मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार असून मान्यवरांच्‍या हस्‍ते यावर्षी या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे.

यापुर्वी संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, मरणोत्‍तर श्रीकांत ठाकरे, अशा विविध मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *