तुकाराम मुंडे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले तर… लोकशाहीचा खरा कस लागेल!

प्रवीण बागड़े नागपूर , मो.क्र. ९९२३६२०९१९ भारतीय लोकशाही ही केवळ मतपेटीपुरती मर्यादित नसून ती मूल्यांवर उभी असलेली व्यवस्था आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र वास्तवात हीच लोकशाही आज अनेक प्रश्नांनी ग्रासलेली दिसते. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो, पण अलीकडच्या काळात हा उत्सव कमी आणि तमाशा अधिक झाला आहे. पैशांची उधळण, जाती-धर्माचे ध्रुवीकरण, सत्तेचा गैरवापर, […]

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय […]

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा? निवडणूक इतिहास, वॉर्ड, आरक्षण ते 2017 निकाल

मुंबई | लोकशासन न्यूज मुंबई महानगरपालिकेची (BMC – Brihanmumbai Municipal Corporation) निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्तास्पर्धा आहे. सुमारे ₹50,000 कोटींहून अधिक वार्षिक बजेट, शहराचा कारभार, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था यामुळे BMC निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. BMC Election 2026 […]

शेतकऱ्यांचा पहिला सेनापती आणि अपूर्ण राहिलेली कृषिक्रांती : डॉ. पंजाबराव देशमुख

प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 भारतीय लोकशाहीच्या पहाटेच्या काळात, जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय मुक्तता एवढाच मर्यादित होता, तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी त्या स्वातंत्र्याला शेतकऱ्यांच्या शेतात, त्यांच्या कष्टात आणि त्यांच्या हक्कांत उतरवण्याचा ध्यास घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात अनेक मंत्री झाले, अनेक धोरणे आली; मात्र शेतकऱ्याच्या वेदनेला संसदेत नेऊन ती राष्ट्राची चिंता बनवणारा नेता विरळाच. […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ शिलेदार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड

प्रविण बागडे नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत दादासाहेब गायकवाड यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांच्या निधनानंतर दलित समाज दिशाहीन होऊ नये, त्यांच्या विचारांची ज्योत विझू नये, यासाठी जी जबाबदारी काही मोजक्या नेत्यांवर आली, त्यात दादासाहेब गायकवाड अग्रस्थानी होते. बाबासाहेबांचा त्यांच्यावर असलेला विश्वास हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर वैचारिक प्रामाणिकतेचा पुरावा होता. भारतीय […]

महायुतीचा दणदणीत विजय कसा झाला ? How Mahayuti Wins ?

महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकाल 2025 जाहीर झाले असून, महायुतीने (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी- अजित पवार गट) एकूण 288 पैकी 207 नगराध्यक्षपदे जिंकून इतिहास रचला आहे. ही निवडणूक 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरची पहिली मोठी चाचणी मानली जात होती, आणि महायुतीने त्यातही आपले वर्चस्व कायम राखले. महत्त्वाचे मुद्दे भाजपने एकट्याने सर्वाधिक 117 नगराध्यक्षपदे जिंकली महायुतीने […]

मुंबईत मुलींचे अपहरण आणि राजकीय मौन : सोयीस्कर गप्पीची भयावह किंमत

प्रवीण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919   मुंबई देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी, प्रगतीचे प्रतीक. मात्र याच शहरात दररोज मुलींच्या अपहरणाच्या, बेपत्ता होण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असताना एक गंभीर प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष गप्प का आहेत? हे मौन केवळ दुर्लक्षाचे नाही, तर राजकीय इच्छाशक्तीच्या अपयशाचे ठळक लक्षण आहे. महिलांची […]

महामानवाच्या स्मृतीतून मनाला भिडणारा महापरिनिर्वाण दिन I Dr. Babasaheb Ambedkar

प्रविण बागडे, नागपूर 6 डिसेंबर हा भारतीय इतिहासातील एक भावस्पर्शी, चिंतनशील आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. हा फक्त एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा दिवस नाही; हा त्या महामानवाच्या विचारज्योतीचा पुनर्जन्मदिन आहे. हा दिवस मानवी स्वाभिमानाची, लोकशाही संस्कृतीची आणि सामाजिक परिवर्तनाची आठवण करून देणारा दिवस आहे. हा दिवस कॅलेंडरवरील फक्त एक दिवस नाही. तो एका महामानवाच्या देहपरीत्यागाचा क्षण असला, तरी […]

निवडणुकीचा खेळखंडोबा : नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती

प्रविण बागडे, नागपूर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अचानक अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आजच्या आदेशाने केवळ उद्याची मतमोजणी पुढे ढकलली नाही, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यातील निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आत्मा. पण या आदेशामुळे आज ही प्रक्रिया परिपक्वतेचा नव्हे, तर पोरखेळाचा नमुना बनल्यासारखी दिसत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा ‘चुकीचा […]

ग्रामीण समृद्धीचा प्रवास, विज्ञानाधिष्ठित प्रगतीचा अभिमान माफसू चा २५ वा स्थापना दिन

प्रवीण बागडे ३ डिसेंबर २००० रोजी नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची (माफसू) स्थापना झाली आणि आज तब्बल पंचविशीचा प्रवास पूर्ण करताना हे विद्यापीठ प्रगतीच्या नवनव्या क्षितिजांना स्पर्श करत आहे. “शिक्षण, संशोधन आणि विस्तार” या त्रिसुत्री ध्येयाने सुरू झालेली ही यात्रा आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणाऱ्या ज्ञानकेंद्राच्या रूपात विकसित झाली आहे. पशुसंवर्धन, […]