शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड)

शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड
(कुलदीप मोहिते, कराड)

कराड, दि. १७ : कराड उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कराड उत्तर तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माजी कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम व उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्या शिफारशीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कराड उत्तर तालुका प्रमुख पदावर शिवडे तालुका कराड येथील संजय गुलाबराव भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
संजय भोसले यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द तडफदार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निष्ठा आजही कायम आहे. संजय भोसले यांनी गेली २५ ते ३० वर्ष पडत्या काळात सुध्दा पक्षाच्या ध्येय- धोरणा प्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण, या ध्येय्या प्रमाणे २००३ रोजी उंब्रज जि. प . गटातून धनुष्यबाण या चिन्हावर जिल्हा परिषद लढवली तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, मग तो पाटण पंढरपूर राज्य मार्ग असो किंवा तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहन धारकांचा टोल देणेचा प्रश्न असो किंवा तासवडे येथील M.I.D.C.मधील वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायम करण्याचा प्रश्न असो, अशी अनेक आंदोलने आजपर्यंत त्यांनी केली. तसेच २०१५ साली शिवडे ग्रामपंचायतच्या सदस्य पदावरसुध्दा सर्वात जास्त मतांनी संजय भोसले विजयी झाले होते.

आज त्यांची निवड झालेमुळे जुन्या व नवीन शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. यात शंका नाही पक्ष वाढीसाठी व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, अशा अशा भावना त्यांनी निवडीनंतर व्यक्त केल्या. त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.