डॉ. दाभोलकर यांच्या खूनाच्या निकालाबाबत महाराष्ट्र अंनिसची निर्धार सभा 

 

पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे समाधान व्यक्त होत असतानाच सूत्रधार मोकळे राहिले याची खंतही व्यक्त केली जात आहे. ही खंत व्यक्त करणारी निर्धार सभा महा. अंनिस पनवेल शाखेने नुकतीच आयोजित केली होती.

या सभेस प्रमुख उपस्थिती महा. अंनिस राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर, ऍड. तृप्ती पाटील यांची उपस्थिती लाभली. सुरुवातीस महेंद्र नाईक, प्रशांत ननावरे, रोहिदास कवळे, तनुश्री खातू, नाजुका सावंत, पूजा डांबरे यांनी निषेध व निर्धारपर मनोगत व्यक्त केले. ॲड. तृप्ती पाटील यांनी कायद्याचे धोडक्यात विश्लेषण केले. निकालातील समाधानकारक गोष्टी तसेच न्यायालयाने तपास यंत्रणेवर कोणत्या गोष्टींवर ताशेरे ओढले हे स्पष्ट केले. तसेच कोणती कलमे लावली व त्यांचे स्वरूप स्पष्ट केले. डॉ. पाटकर यांनी समाज, कार्यकर्ते यांची मानसिक अवस्था मांडली. गांधींच्या खूनानंतर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनानंतर उठलेल्या प्रतिक्रिया यातला फरक पाहता आपण अधिक विवेकी वागत आहोत असे ते म्हणाले. आपण समाजालाही समजून घ्यायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. या नंतर राज्य कार्यवाह आरती नाईक यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खुनानंतरचा प्रवास व या निकालाविषयी संघटनेची भूमिका मांडली. अल्लाउद्दीन शेख यांनीही आपले मत मांडले. चार युवा कार्यकर्त्यांनी हिंसामुक्त समाजासाठी प्रत्येकी एक संकल्प मांडला. तो संकल्प प्रत्येकाने केला.

या सभेस अल्लाउद्दीन शेख, प्रवीण जठार, नवी मुंबई कार्याध्यक्ष अशोक निकम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रियांका खेडेकर हिने केले. सभेची सुरुवात डॉ. दाभोलकरांच्या अभिवादन गीताने झाली तर समारोप हम होंगे कामयाब या गीताने झाली.

ग्रेगोरियन पब्लिक स्कूल येथील कु.आर्या बडे सीबीएसई दहावी बोर्डात प्रथम

 

पाली :  बेणसे दि. (धम्मशील सावंत )
सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीची निकाल दि १३ मे रोजी जाहीर झाला असून त्यामध्ये ग्रेगोरियन पब्लिक स्कूल किल्ले ता.रोहा जिल्हा.रायगडची विद्यार्थ्यींनी कु.आर्या सुनिल बडे हिने ९७%गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर कुमरी शर्वी अरेकर हिने ९५%गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तृतीय क्रमांक कु.प्रिशा जैन हिने ९४.६% पटकावला आहे.

विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यां मध्ये तिन्ही मुलींनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावून मुलांन पेक्षा मुली कुठेच मागे नसल्याचे सिध्द केले आहे. कु.आर्या,कु.शर्वी,कु.प्रिशा या गुणी मुलींचे ग्रेगोरियन पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक मिस.रेमोल वर्गीस व फादर बेजाॅय जाॅर्ज व स्कूल मधील सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. कु.आर्या सुनिल बडे हिचे वडील सुनील लक्ष्मण बडे , सॉलवे कंपनी धाटाव एम.आय.डी.सी रोहा,येथे प्रोडक्शन ऑफिसर आहेत.
तर आई सौ.करुणा बडे, डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी कॉलेज,गोवे कोलाड,येथे ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत.संपूर्ण कुटुंब उच्च विद्याविभूषित आहे.कु.आर्या बडे हिच मुळ गाव आंबेघर पो.पिगोंडे ता.रोहा जिल्हा.रायगड येथील आहे.कु. आर्याने दहावी बोर्डात शाळेत प्रथम क्रमांक पटकावून आंबेघर गावचे नाव रोशन केले असून आर्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

म्हसाळा तालुक्यात गोधन चोरीची संख्या वाढली, शेतकऱ्यांकडून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी.

 

म्हसळा – सुशील यादव

लोकनी राणा किंवा गावाचे आसपास चर सोडली गाय वर्गीस गुरे घर परत येत आहेत ती उघडकीस असा प्रश्न गावा शेतकरी शेतकरी राजाला आवासून कळत आहे ? म्हसळा नांगर अनेकांची दुभती गाये जनावरे आणि चोरीची बैल जात जात आहे. गो धन चोरीला गेल्याचे उलगडा गावामध्ये अनेक घटना घडल्या असल्या तरी गोधन चोरीच्या घटना अधुन मधुन घडल्या आहेत.

अशीच गोधन चोरीची घटना घडली आहे.अशीच गोधन चोरीची घटना आहे.अशीच गोधन चोरीची घटना आहे. १४/०४/२०२४ पासुन चोरीला आहे. रोजच्या रोजा शेजारील शेजारील गावावर गाय आणि तिची कालवड चरायला त्यानात आहेत.अनेक दिवस शोध घेउन त्या चंद्राबाई उघड्या अज्ञात व्यक्तीकांत कांबळे यांनी म्हसळा पोलिसी गोधन लढ्याची लढाई सुरू केली आहे.तक्रार अर्जात त्यांनी शोधून काढली आहे. तक्रार अर्जात त्यांनी यागोदर दोन गाई आणि बैल चोरीला गेल्याचे नमुद केले आहे. म्हसळालेत चोरीत अधुन शांतेचे गोधन चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत.गुरेच्या घटना घडल्या आहेत. अपघातामधील घटनांमध्ये वर्गाचे नुकसान झाले आहे.