नमो चषक 2024  भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नमो चषक 2024

 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

      कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांचे नियोजन

 

कुलदीप मोहिते कराड

 

भारतीय जनता पार्टी कराड उत्तर यांच्या वतीने कोपर्डे तालुका कराड येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

   मा. संग्राम बापू घोरपडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले यावेळी सुरेश तात्या पाटील, शंकरराव शेजवळ, शैलेश चव्हाण, दादा चव्हाण, शरद चव्हाण, प्रशांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना मा. संग्राम बापू भोसले म्हणाले ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी व पुढे हेच खेळाडू भविष्यामध्ये जिल्हा,राष्ट्रीय व राज्यपातीवर खेळण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून नमो चषक कबड्डी 2024 स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघ सहभागी झाले असून जवळपास 80 संघानी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक असे क्रमांक काढले असून प्रत्येक विजयी संघास रोख पारितोषिक व ट्रॉफी देण्यात येणार आहे. 70 किलो वजन गट, 55 किलो वजन गट व 65 किलो वजन गटांमध्ये खेळण्यात आलेल्या स्पर्धा आहेत.प्रथम क्रमांक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय धर्यशील दादा कदम, निवडणूक प्रमुख . मनोजदादा घोरपडे, किसान मोर्चा महाराष्ट्र सचिव रामकृष्ण वेताळ जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष माननीय चिन्मय कुलकर्णी युवा मोर्चा अध्यक्ष माननीय अक्षय भोसले अक्षय पैलवान यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सुनील शिंदे बापू दिपालीताई खोत सीमा घार्गे,महेश चव्हाण, सुदाम चव्हाण, जायसीग चव्हाण, कृष्णतः चव्हाण, विवेक चव्हाण,बापू चव्हाण, शुभम चव्हाण,आबा चव्हाण, गणेश चव्हाण, राम काशीद, संदीप चव्हाण,जयंत पाटील, अजित चव्हाण, सचिन चव्हाण संतोष वांगडे, रामकांत वांगडे आदी मान्यवर उपस्थित होते