महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ आणि असंघटित कामगार संघटनांचे प्रणेते बाबा आढाव यांच्या निधनाची अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. देशभरातील हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, काच–पत्रा वेचक कामगार, तसेच विविध असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लढवय्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधकी विचारधारेवर उभे राहून समाजातील तळागाळातील […]
