लातूर ( विशेष प्रतिनिधी) नटवर्य श्रीराम गोजमगुंडे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा मोहोरलेला समारोप यंदा एका वेगळ्याच कलरसिक वातावरणात पार पडला. रंगभूमीवर उमलणाऱ्या नव्या कलेच्या कळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत गुणगुणणाऱ्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ आणि सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण सभागृहात एक उत्साहाची […]
