जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे

जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी – आमदार जयकुमार गोरे

 

मिलिंदा पवार -लोकशासन न्युज सातारा

जिहे कटापूर पाणी योजने संदर्भात आंदोलनाची नोटंकी करणाऱ्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर चर्चा करावी असे जाहीर आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे .
वडूज तालुका खटाव येथील वडूज मधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमदार गोरे म्हणाले की पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार ‘ टेल टू हेड ‘ पाणी देण्याचा कायदा असूनही खटावला पाणी देण्यास नेहमीच प्राधान्य दिले आताही उरमोडी चे पाणी वडूज मधील सातेवाडी परिसरात वाहत आहे .
पहिल्यांदा शेवटच्या भागात पाणी देणे गरजेचे असते त्यामुळे मान तालुक्यात पाणी आधी दिले या पाण्याच्या पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हटले की काहींच्या पोटात दुखायला लागले यातूनच आंदोलनाची निर्मिती झाली . पाणी सुटण्याची तारीख जाहीर झाली की त्यांना आंदोलन सुचते .आंदोलन करणे हे काहींचा धंदा बनले आहे आंदोलन करून खंडणी गोळा करणारे माणस आहेत त्यांच्यासारख्या माणसांमुळे खटावला अधिकारी यायला धजावत नाहीत . आपण खटाव मान असा दुजाभाव कधी केला नाही पण काही आप मतलबी लोक दोन तालुक्यात संघर्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत

तारळी योजनेचे पाणी येत आहे अथक प्रयत्न करून जि हे कठापूर चे पाणी येत आहे तर खटाव तालुक्यात आंदोलनाची नाटके करणाऱ्यांनी कधी कौतुकाचा एक शब्द काढला नाही . शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आणणारे पाण्याची चोरी करत आहेत
सर्वसामान्य लोकांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहावे असे आवाहन गोरे यांनी केले
या पत्रकार परिषदेच्या वेळेस नगराध्यक्ष मनीषा काळे, नगरसेवक जयवंत पाटील, बनाजी पाटोळे, सोमनाथ जाधव ,अनिल माळी , अमोल गोडसे , श्रीकांत माळी , रेश्मा बनसोडे ,सोमनाथ भोसले , शशिकांत पाटोळे , गणेश गोडसे , प्रदीप खुडे , रवींद्र शेठ काळे , श्रीकांत खुडे यांची उपस्थिती होती .
विकासनिधीची लोकसंख्येच्या निकषावर 60 आणि 40 टक्के विभागणी करतोय. पाणी देण्यात खटावला प्राधान्य देतोय, औंधसह 22 गावांच्या पाण्याचा विषय मी विधानसभेत मांडताच या आंदोलकांनी नाटके केली. त्या भागात पाण्याची तरतूद मी करुन घेतली आहे.

पाणी आणि विकासाचा अजेंडा घेऊन मी काम करतो. मला आमदार करणारे समाधानी असून, ते माझ्याबरोबर आहेत. ज्यांनी मला कायम विरोध केलाय, त्यांना मला जाब विचारायचा अधिकार नाही. तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी आणि विकासासाठी कुणी काय केले याचा लेखाजोखा एका व्यासपीठावर मांडण्याचे आव्हानही त्यांनी दिले

 काही भागातील अनेक गावांत पाणी नव्हते, तरी त्यांनी आंदोलने केली नाहीत. शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून, सूतगिरणीसाठी भागभांडवल मिळवण्यातून  काही जणांना  वेळ नव्हता. त्यातील गोलमाल लवकरच बाहेर काढावा लागणार आहे.

भ्रष्टाचार करता यावा म्हणून, चारा छावण्यांसाठी काही जन आंदोलने करत आहेत. असा टोला यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना लगावला.