कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयात कृष्णा नदी बचाव चळवळ नैसर्गिक कलर व नैसर्गिक स्रोत वाचवण्यासाठी व पाणी बचत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये करते प्रबोधन

कुलदीप मोहिते कराड

सध्या रंगपंचमी निमित्त होणाऱ्या नदी प्रदूषणा बाबत कृष्णा बचाव चळवळीच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये नैसर्गिक स्त्रोत वाचवण्यासाठी प्रबोधन केले जात आहे ….
.. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई जाणवत आहे काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक जबाबदारी म्हणून पर्यावरण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी गोव्याची सामाजिक संस्था विवेकानंद पर्यावरण फौज गोवा यांच्या सहकार्याने पर्यावरण अभ्यासक नदी बचाव चवळीचे सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र केरकर गोवा यांच्या मार्गदर्शनाखाली नदी बचाव साठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार व त्यांची टीम यांनी कराड तालुक्यातील सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना नैसर्गिक कलर निर्मिती व नदी प्रदूषणाबाबत प्रबोधन केले आहे

गोव्याच्या विवेकानंद फौज सदस्य सूर्यकांत गावकर यांनी बनवलेले नैसर्गिक कलर यांची कार्यशाळा कराड तालुक्यातील शाळांमध्ये घेतली गेली या मोहिमेत न्यू इंग्लिश स्कूल करवडी कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल ओगलेवाडी शिवाजी विद्यालय मसूर विठामाथा विद्यालय कराड आनंदराव चव्हाण विद्यालय मलकापूर प्रमिलाताई चव्हाण कन्या शाळा मलकापूर आदर्श विद्या मंदिर मलकापूर आदर्श विद्यामंदिर विंग.रामविलास लाहोटी कन्या शाळा कराड ज्योतिर्लिंग विद्यालय कवठे श्री संत तुकाराम विद्यालय कराड या शाळेनी प्रचंड प्रतिसाद दिला या मोहिमेसाठी कृष्णा नदी बचाव चे राहुल पवार विजय जगताप अशोक सुतार आबासाहेब चव्हाण प्राजक्ता जगताप विजया माने माधवी पवार रामनाथ परब सूर्यकांत गावकर व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला गेला आहे

या कृष्णा नदी बचाव चळवळीच्या या नैसर्गिक स्त्रोत वाचवण्याच्या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर गिरीश राऊत प्रणाली राऊत निर्मला सावंत गोवा राज्याचे सभापती रमेश तवरकर कराडचे युवा नेते सौरभ पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कृष्णा बचाव चळवळीच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न

कुलदीप मोहिते कराड

कराड तालुक्यातील आजी/माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी अमृत वीर जवान अभियान निमित्त सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सैनिक मेळाव्याचे आयोजन विजय पवार तहसिलदार कराड यांचे अध्यक्षतेखाली दि. 5/3/2024 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय कराड येथे करण्यात आले होते व कराड तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.

. तहसीलदार विजय पवार यांनी सैनिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेत त्यांचे अर्ज समस्या व प्रलंबित तक्रारी विषयी तात्काळ दखल घेतली जाईल असे आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले सैनिकांच्या साठी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आपण महसूल विभागाशी संपर्क साधावा व महसूल प्रशासन आपल्याला मदत करेल असे त्यांनी आश्वासित केले. या वेळी सर्व सैनिकांचे व त्यांच्या परिवाराचे तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आले. तक्रारीचे निराकरण करनेत आले.
व माजी सैनिक . माणिकराव पाटील मौजे शिरवडे ता.कराड यांचे बरेच दिवसा पासूनचे प्रलंबित असणारे 32 ग.चे प्रकरण अमृत वीर सन्मान अभियान अंतर्गत च्या सिनिकांच्या पाहिल्या मीटिंग मध्ये निकाली काढून त्यांना शासकीय नियमा नुसार चलन भरणे साठी देणेत आले व माजी सैनिकाला न्याय दिल्या बद्दल माजी सैनिक .माणिक पाटील यांनी मा. तहसीलदार विजय पवार यांचा पुष्पगुच्छ,शाल ,श्रीफळ देऊन सनमान केला.

या कार्यक्रमाप्रसंगी राजेन्द्र चव्हाण तहसील कार्यालय, प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व अमृत वीर सन्मान अभियान माजी सैनिक संघटना प्रतिनिधी व जिल्हा संरक्षण कमिटी सदस्य,कराड दक्षिण तालुका अध्यक्ष चंद्रकांत साठे,माजी सैनिक विनोद वाघमारे, हणमंत शिरतोडे, हणमंत चव्हाण,.उमाजी सूर्यवंशी, शहीद वीर पुत्र सुरज जगताप,सर्व माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय उपस्थीत होते.

इतरांनीही शिवयोद्धा प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा नामदार शंभूराजे देसाई (कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)

इतरांनीही शिवयोद्धा प्रतिष्ठानचा आदर्श घ्यावा: नामदार शंभूराजे देसाई
(कुलदीप मोहिते, उंब्रज कराड)
उंब्रज : श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज( कराड )हे समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी वेळोवेळी आपल्या सामाजिक कार्यातून दाखवून देत आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्य हे प्रेरणादायी असून अतिशय कौतुकास्पद आहे इतरांनीही यांचा आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार नामदार शंभूराजे देसाई यांनी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्या वतीने उंब्रज तालुका कराड येथे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या वेळी काढले
श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान व
गांधी फाउंडेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने उंब्रज तालुका कराड येथे
मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन, करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सातारचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये मोफत सर्वं रोग निदान व औषध उपचार 305 रुग्णांवर करण्यात आले तसेच 306 रुग्णांची नैत्र तपासणी करून 246 रुग्णांना चष्मे देण्यात आले. तर लगेचच 60 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे . तसेच या शिबिरामध्ये
175 ई आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी झाली आणि लवकरच ती वितरीत केली जाणार आहे तसेच .84 रुग्णांच्या लॅब टेस्ट झाल्या. तर 8० रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले.
यावेळी श्री जयवंतराव शेलार सदस्य जिल्हा नियोजन समिती सातारा प्रशांत बधे सहाय्यक पोलिस निरीक्षक उंब्रज गांधी फौडेशनचे श्री धीरज गांधी इ.मान्यवर उपस्थिती लाभली .
श्री शिव योध्दा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रार्यक्रमास गांधी फौडेशन कराड राजर्षी शाहू चॅरिटेबल आय हॉस्पिटल यश लॅबचे अमोल पवार कॉटेज रुग्णालय कराड व प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शिव योध्दा प्रतिष्ठानचे संतोष बेडके, शरद जाधव, रणजीत कदम, अमोल कांबळे, परेशकुमार कांबळे,रविंद्र वाकडे, अरुण कमाने, विक्रम सुर्यवंशी, हर्षल बेडके, अक्षय यादव , ई. परिश्रम घेतले.

कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड !

लोकशासन news नेटवर्क

कु. वैभवी कुंभारला राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत निवड!
(कुलदीप मोहिते कराड)
सातारा:वैष्णवी कुंभार हिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळाले असून तिची राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा अ मॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन व एपी स्पोर्ट्स अकॅडमी आगाशिवनगर ता. कराड ची खेळाडू कु. वैभवी चेतन कुंभार हिने नाशिक येथे झालेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या अंतर्गत राज्यस्तरीय तायक्वांदो जुनियर चॅम्पियनशिप मध्ये फ्री स्टाईल पुमसे प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले, व तिची जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तिला प्रशिक्षक म्हणून.अक्षय खेतमर यांचे मार्गदर्शन लाभले तर कराड तालुका अध्यक्ष .अमोल पालेकर यांचे मार्गदर्शन बहुमूल्य सहकार्य मिळाले तिच्या या अभिनंदनइय निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन होत आहे . तसेच सातारा जिल्हा अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुनील कोडगुले सरचिटणीस .संतोष सस्ते, सचिव .विजय खंडाईत, खजिनदार .गफार पठाण या सर्वांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.