लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने काम करत आहे. मतदारांना मतदान करताना सोईचे जावे, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदारांना त्यांच्या मतदार यादीतील नावांची माहिती व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप व […]
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये […]