विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत

विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत

मंगरूळपीर : लोकशासन news नेटवर्क

31 जानेवारी 2024 बुधवार रोजी वाशिम येथील चिंतामणी हॉल येथे मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा 2024 मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मंगरूळपीर साप्ताहिक विश्वकल्याणचे संपादक तथा न्यूज वन इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विनोद रामकृष्ण डेरे यांचा विवेक खडसे जिल्हा माहिती अधिकारी वाशिम व सुरेखा ताई आधारवाडे, स्वागताअध्यक्षा, सुनील कांबळेआकाशवाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष, दलित मित्र पुरस्कार प्राप्त गोपाळराव आटोटे , वंचित चे डॉक्टर सिद्धार्थ देवळे आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह मूकनायक चे पुस्तक शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाचे आयोजक मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा आयोजन समिती वाशिम यांनी केले होते.