मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीरामक गायकवाड यांना लॉर्डबुद्धा टीव्ही च्या मूकनायक पत्रकार पुरस्कारानी सन्म्मान

मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीरामक गायकवाड यांना लॉर्डबुद्धा टीव्ही च्या मूकनायक पत्रकार पुरस्कारानी सन्म्मान

मुंबई ( विशेष प्रतिनिधी)

लॉर्ड बुद्धा टीव्ही च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्य मुकनायक पत्रकार पुरस्कार देऊन लातूर चे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना महाराष्ट्र सरकार चे माजी समाजकल्याण मंत्री आणि मुंबई चे माजी इंकमटैक्स प्रिंसिपल कमिशनर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
भारतीय संसदेत पहिल्यांदा निवडून आल्यावर खासदार की ची शपथ घेताना इतिहासात पहिले खासदार जयभीम म्हणून शपथ घेतलेले डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी संसदेत अनेक प्रश्न मांडले प्रामुख्याने दलित अत्याचारप्रतिबंधक कायद्यावर संसदेत भाषण, दलित अत्याचार झालेल्या कुटुंबाला मदतीचा प्रश्न लोकसभेत मांडला, विशेष म्हणजे देशातील जेवढे शासकीय ग्रंथालय आहेत त्या सर्व ग्रंथालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,अजिंठा लेणी येथे अंतरराष्ट्रीय पाली विद्यापीठाची सुरुवात केंद्र सरकार नी करावी.असे अनेक प्रश्न बौद्ध समाजाचे संसदेत मांडले होते.असे अनेक कामाची दखल घेऊन लॉर्डबुद्धा टीव्ही ने या वर्षी चा मूकनायक पत्रकार पुरस्कार देऊन संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना देऊन त्यांचा भव्य सत्कार मुंबई च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आला.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडीओ द्वारा शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रमाला अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, लॉर्डबुद्धा टीव्ही चे संचालक भैयाजी खेरकर,लॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक सचिन मुन,संगीत सचिन मुन,राजू मुन,आदी उपस्थित होते.
लॉर्डबुद्धा टीव्ही चे बुद्धा प्ले हे ऍप अँड्रॉईड आणि आयओएस वर केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्याचे लॉर्डबुद्धा टीव्ही प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या मूकनायक पत्रकार पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.