शनिवारी उदगीर येथे काँगेस नेत्या प्रियंका गांधींची सभा

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस नेत्या प्रियंका गांधी यांची शनिवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उदगीर येथे सभा आयोजीत करण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या सभांना देशभरात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने लातूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. काळगे शिवाजी बंडाप्पा यांच्या प्रचारार्थ लातूर लोकसभा मतदार संघातील महत्वाचे शहर असलेल्या उदगीर येथे प्रियंका गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेची जय्यत तयारी सुरु असून संपूर्ण मतदार संघातून मोठया प्रमाणात नागरिक या सभेला उपस्थित राहणार आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील युवक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, युवक यासह सर्व समाज घटक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नेते यांनी केले आहे.