उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

 

 उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख स्वराज्याचे शिलेदार असे वेशभुषा धारण केलेले बालकलाकार अशा आकर्षक कलाकृतीत मिरवणूक पार पडली.
चॅम्पियन कराटे क्लब श्रीवर्धन – म्हसळामधील विद्यार्थ्यांनी चित्त थरारक मनोरे सादर केले. म्हसळा नगरीतील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही शिवजयंती उत्सव मोठ्या संख्येने साजरी कऱण्यात शिवसेना शहरप्रमूख श्री. विशाल सायकर , युवासेना तालुका अधिकारी श्री. कौस्तुभ विलास करडे , तालुकाप्रमूख श्री . सुरेश कुडेकर, तालुकाप्रमूख श्री.प्रसाद बोर्ले, तालुका अधिकारी श्री.स्वप्नील चांदोरकर, नगरसेविका सौ.राखी करंबे, शहर अधिकारी श्री. अजय करंबे, शहर संघटक श्री. अभय कलमकर, युवासेना तालुका चिटणीस श्री.राहुल जैन,उपशहर प्रमुख श्री. दिपल शिर्के, उपशहर प्रमुख  उपतालूका प्रमूख श्री. प्रवीण बनकर, उपशहर अधिकारी, कु. स्वानंद बोरकर, शाखाप्रमुख श्री. अंकुश नटे, शिवसैनिक श्री. प्रतीक गोविलकर या सर्व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.व विशाल सायकर शिवसेना शहर प्रमुख यांनी सांगितले की  शहरात विविध सण उत्सव नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही दिमाखात साजरे करणार त्याच प्रकारे गरजा महाराष्ट्र प्रतिष्ठानचे सचिन करडे यांनी देखील आम्हाला मोलाचे सहकार्य केले व शहरातील विविध स्थरातील नागरिक व विविध पक्ष  पदाधिकारी  आमच्यासोबत येऊन जे सहकार्य केले त्याबद्दलही मी सर्वांचेे आभार मानतो असे यावेळी  विशाल सायकर यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव

रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट नव्या जोमाने कामाला लागली आहे.स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्हयातील शिवसैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी १ आणि २ फेब्रुवारीला रायगड दौऱ्यावर येणार आहेत.दोन फेब्रुवारीला श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा शहरात दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.यामुळे या सभेची जनतेत उत्सुकता आहे.उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विभागवार बैठका आयोजित करण्यात येत आहेत.उध्दव ठाकरे यांच्या सभेनिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला आहे.आयोजीत सभेची शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरू केली असून प्रत्येक गावागावातून,वाडी वस्त्यांमधून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे नवगणे यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, तालुका प्रमुख सुरेश कुडेकर,संपर्क प्रमुख गजानन शिंदे,बाळा म्हात्रे,दीपल शिर्के,अमित महामुणकर, शौकत हजवाने आदी शिवसैनिक उपस्थित होते.