या कार्यक्रमात भारतातील आघाडीच्या छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यातून वडील-मुलींच्या हृदयस्पर्शी क्षणांचे टिपण झाले असून, प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत ७०० हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यात आला आहे.
मुंबई : प्रोजेक्ट नन्ही कलीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा निधी संकलन उपक्रम ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ याचे दहावे सत्र 13 आणि 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे पार पडले. या मैलाचा दगड ठरलेल्या सत्राला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल 240 वडील–मुलींच्या जोड्या या उपक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमातून उभारण्यात आलेला निधी प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत 700 हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार असून, त्यांना शिकण्याची, नेतृत्व करण्याची आणि उंच भरारी घेण्याची संधी मिळणार आहे.
‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ या उपक्रमाची संकल्पना महिंद्रा समूह व के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि नामवंत छायाचित्रकार अतुल कासबेकर यांनी मांडली. मुलींबाबत समाजातील दृष्टिकोन बदलणे आणि लिंगसमतेचा पुरस्कार करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वडिलांची भूमिका केवळ संरक्षक म्हणून न दाखवता, मुलींच्या स्वप्नांसाठी ठामपणे उभे राहणारे समर्थक म्हणून अधोरेखित करत हा उपक्रम दीर्घकाळ रुजलेल्या रूढी-परंपरांना आव्हान देतो. प्रत्येक छायाचित्र हे एक दृश्यात्मक वचन ठरते—जेव्हा वडील आपल्या मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तेव्हा पिढ्यान्पिढ्यांचे अडथळे दूर होतात आणि प्रत्येक मुलीसाठी नव्या शक्यतांची दारे उघडतात.
नामवंत छायाचित्रकार अतुल कसबेकर, कॉल्स्टन जुलियन, जयदीप ओबेरॉय, जतिन कांपनी, प्रसाद नाईक, रफीक सईद, रिड बर्मन आणि तरुण खिवाल यांनी आपली कलात्मक दृष्टी आणि सर्जनशील कौशल्ये उदारपणे देत ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने अविस्मरणीय बनवला. प्रत्येक छायाचित्राला त्यांनी जपून ठेवावी अशी आठवण दिली, तसेच बदल घडवून आणण्यासाठी आणि प्रभाव निर्माण करण्यासाठी छायाचित्रणातील कथाकथनाची ताकद अधोरेखित केली. सामाजिक हितासाठी आपल्या कलेचा वापर करण्याची त्यांची बांधिलकी या कार्यक्रमाला अधिक सखोल अर्थ देणारी ठरली आणि सक्षमीकरण व आशेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवला.
यंदाच्या वर्षीची संकल्पना ‘विंग्स ऑफ करेज’ (धैर्याचे पंख) ही दोन प्रभावी सत्यांचा उत्सव साजरा करते. मुलींसाठी—जेव्हा त्यांना आपण पाहिले जातो, आपले मोल ओळखले जाते आणि आपल्यावर विश्वास ठेवला जातो, त्या क्षणी धैर्याला पंख फुटतात. तर वडिलांसाठी—अभिमान हा बदलाचा प्रवर्तक ठरतो; तो त्यांना आपल्या मुलींच्या पाठीशी उघडपणे, ठामपणे आणि निर्भीडपणे उभे राहण्यास प्रेरित करतो. ही संकल्पना प्रोजेक्ट नन्ही कलीच्या मुख्य ध्येयातून प्रेरित असून, 21व्या शतकातील कौशल्ये आणि क्रीडा नेतृत्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलींना उंच भरारी घेण्यासाठी पंख देणे हा तिचा केंद्रबिंदू आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक वडील–मुलीच्या जोडीकडून व्यावसायिक फोटोशूटसाठी 10,000 रुपये इतके योगदान देण्यात आले. या प्रत्येक योगदानातून प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत एका मुलीच्या संपूर्ण एका वर्षाच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातो. शिक्षण आणि कौशल्य विकासाबरोबरच, प्रोजेक्ट नन्ही कलीच्या नव्या अभ्यासक्रमात चिकित्सक विचार, क्रीडा आणि संघभावनेच्या माध्यमातून नेतृत्व कौशल्यांवर विशेष भर देण्यात आला असून, 21व्या शतकात यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी मुलींना सक्षम बनवण्याचा उद्देश आहे.
गेल्या काही वर्षांत ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ या उपक्रमात अनेक नामवंत वडील–मुलींच्या जोड्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. यामध्ये नेहा धुपिया–प्रदीप सिंग धुपिया, विद्या बालन–पी. आर. बालन, शत्रुघ्न सिन्हा–सोनाक्षी सिन्हा, सचिन तेंडुलकर–सारा तेंडुलकर आणि लिएंडर पेस–आयाना पेस यांसारख्या सेलिब्रिटी जोड्यांचा समावेश आहे.
स्थापनेपासून आजपर्यंत ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ हा उपक्रम आशा आणि सक्षमीकरणाचे प्रतीक ठरला आहे. 15 नामवंत छायाचित्रकारांच्या सहभागातून या उपक्रमाने आतापर्यंत प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत 6,297 मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारला आहे.
महिंद्रा समूह आणि के. सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, “दरवर्षी प्रोजेक्ट नन्ही कलीचा ‘प्राउड फादर्स फॉर डॉटर्स’ हा उपक्रम आपल्याला एक साधं पण महत्त्वाचं सत्य आठवण करून देतो—जेव्हा एखादा वडील आपल्या मुलीच्या शिक्षणात आणि स्वप्नांत गुंतवणूक करतो, तेव्हा तो तिच्या भविष्यासाठी सर्वात भक्कम पायाभरणी करतो. हा उपक्रम केवळ वडील–मुलींच्या नात्याचा उत्सव राहिलेला नाही, तर प्रत्येक मुलीला शिकण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळावी, या विश्वासाचं आंदोलन बनला आहे. या कार्यक्रमासाठी वेळ आणि कौशल्य उदारपणे देणाऱ्या सर्व छायाचित्रकारांप्रती मी मनापासून कृतज्ञ आहे; त्यांच्या योगदानामुळे प्रोजेक्ट नन्ही कलीअंतर्गत अनेक मुलींसाठी निधी उभारता आला. या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आणि सलग दहा उल्लेखनीय सत्रांत त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल अतुल कासबेकर यांचे विशेष आभार; त्यांच्या बांधिलकीमुळे या उपक्रमाच्या प्रभावासोबतच त्याच्या संवेदनशीलतेलाही आकार मिळाला आहे.”
प्रोजेक्ट नन्ही कलीच्या कार्यकारी संचालक आणि महिंद्रातील सीएसआरच्या वरिष्ठ उपाध्यक्षा शीतल मेहता म्हणाल्या, “प्रोजेक्ट नन्ही कलीमध्ये आम्ही नेहमीच असा विश्वास ठेवतो की, जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षण देता, तेव्हा तुम्ही संपूर्ण समुदायाला उंचावता. 21व्या शतकातील कौशल्ये आणि क्रीडा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करणाऱ्या आमच्या नव्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुलींना उंच भरारी घेण्यासाठी आवश्यक ती पंखे देत आहोत—आत्मविश्वासाची पंखे, नेतृत्वाची पंखे आणि धैर्याची पंखे. ‘विंग्स ऑफ करेज’ ही संकल्पना या प्रवासाचा उत्सव आहे—जिथे वडील अभिमानाने आपल्या मुलींच्या पाठीशी उभे राहतात आणि मुलीही अनुभवतात की, पाठिंबा आणि विश्वास मिळाल्यावर त्या किती उंच उडू शकतात.”
