जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाची नाराजी जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेवुन प्रविण दरेकर यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट
उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होणार बैठक
मुंबई दि. 30 – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपात भाजप महायुतीने रिपब्लिकन पक्षावर अन्याय केला असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या नाराजीचे वृत्त जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेवुन भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बांद्रा येथील कार्यालयात भेट घेण्याची शिष्टाई केली. यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाच्या स्वबळावर लढणा-या 38 उमेदवारांपैकी मेरीटच्या 15 जागांना महायुतीतुन पाठिंबा देण्यात येईल. रिपब्लिकन पक्षाला निवडक जागा सोडण्याबाबतच्या उद्या बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची संयुक्त बैठक उद्या घेण्यात येणार आहे अशी माहिती या बैठकीनंतर प्रविण दरेकर यांनी आज बांद्रयात जाहीर केले.
बांद्रा येथील कार्यालयात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे विविध नेते येथे उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे नेत्यांशी प्रविण दरेकर यांची अर्धा तास चर्चा केली. रिपब्लिकन पक्षाची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर 38 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यातील महत्वाच्या जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याबाबत महायुतीचा विचार विनीमय सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे आणि भाजपचे संबंध चांगले असून ते खराब होवू नयेत यासाठी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेण्यास पाठवले. रिपब्लिकन पक्षाला समाधानकारक जागा सोडण्याबाबत उद्या अंतीम चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बैठक होईल, त्यामध्ये अंतीम निर्णय घेण्यात येईल. मात्र 38 जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे ठामपणे स्वबळावर मैत्रीपूर्ण लढत लढतील याचा पुर्नउच्चार रामदास आठवले यांनी केला.
