मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रे महानगरपालिकेस प्राप्त एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि […]

सोलापूर बसस्थानाकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित !

सोलापूर: २८ नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘ आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]

Dharmendra : धर्मेंद्र : पडद्यामागचा सच्चा माणूस, पडद्यावरचा अमर नायक

प्रवीण बागडे, नागपूर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नायक आले, चमकले आणि लोप पावले, पण काही चेहरे असे आहेत जे काळाच्या ओघातही फिके पडत नाहीत. त्यांपैकी एक नाव म्हणजे धर्मेंद्र. “ही-मॅन ऑफ बॉलीवुड” म्हणून प्रसिद्ध झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरील नायक नव्हता, तर माणूस म्हणूनही एक हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व होता. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये […]

‘आयफोनवाल्यांनाच’ मेट्रो सवलत ? दिव्यांगांवरील ही कोणती प्रशासनिक थट्टा ! Mumbai Metro

विशेष प्रतिनिधी : मुंबई मेट्रो प्रशासनानं दिव्यांगांसाठी 25 टक्के सवलतीची घोषणा केली… पण अट वाचल्यावर दिव्यांग प्रवाशांनी डोक्यावर हात मारला. कारण ही सवलत मिळते ती फक्त आयफोन वापरणाऱ्या दिव्यांगांना! अँड्रॉइड वापरकर्ते—जे संख्येने सर्वाधिक, आर्थिक क्षमता कमी, संघर्ष अधिक—ते मात्र सवलतीपासून वंचित. त्यामुळे ही घोषणा दिलासादायक नसून दिव्यांगांवरची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे. “सवलत […]

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका

मुंबई : सायबर गुन्हे आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतक्या वेगाने बदलत चालले आहेत आणि घोटाळेबाज आता अत्यंत नेमकेपणाने कुरियर कंपनीपासून ते पेमेंट गेटवेपर्यंत कोणीही असल्याचे नाटक करू शकतात. एखादा खोटा डिलिव्हरी मेसेज, छोट्या पेमेंटची मागणी करणारी एक लिंक किंवा ओटीपी मागणारा कॉल – एवढ्यानेही आपण त्यांच्या डिजिटल सापळ्यात अडकत असल्याचे फेडएक्सने निदर्शनास आणले. जर तुम्हाला […]

नागपुरात हाय अलर्ट : संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

नागपूर: नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनलगत कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (महाल) आणि रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागपूर पोलिस आयुक्तालयाकडून सर्व संवेदनशील ठिकाणांना अलर्ट जारी. महाल, रेशीमबाग, नागपूर उच्च न्यायालय, विधानभवन, विमानतळ, रेल्वे स्टेशन, […]

दिल्ली स्फोट : मृतांचा आकडा 13 वर पोहोचला

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी जोरदार स्फोट झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा 13 वर पोहोचला, तर सुमारे 30 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा स्फोट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये झाला. स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूच्या अनेक गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. दिल्लीमध्ये 2011 नंतरचा हा पहिला मोठा […]

दिल्ली स्फोट : गृहमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट

घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा घेतला आढावा नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ आज, सोमवारी स्फोट होऊन 13 जण मृत्यूमुखी पडले. तर अनेक जण जखमी झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच गृहमंत्र्यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेतली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या भीषण स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला असून […]

ज्योत से ज्योत जगाते चलो .. प्रेम की गंगा बहाते चल

न्युक्लिअर बॉम्बची होड सृष्टीसाठी धोकादायक सतपालजी महाराज यांनी दिला सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली: विकसीत देशांमध्ये जास्तीत जास्त न्युक्लिअर बॉम्बचा साठा करण्याची होड लागल्यामुळे या जगापुढे अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असल्याची भीती अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांनी व्यक्त केली आहे. ​श्री हंसजी महाराज यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत आयोजित द्विदिवसीय सद्भावना संमेलनाला संबोधित करताना हे मत […]

मानव धर्माच्या प्रचारासाठी दिल्लीत ‘सद्भावना संमेलन’ 17 राज्यांतील ४५० संत—महात्म्यांची उपस्थिती

नवी दिल्ली : मानव धर्माचा प्रचार करून देशात सद्भावना स्थापन करण्यासाठी देशाच्या राजधानीत ”सद्भावना संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वेद आणि धर्मशास्त्रांत पारंगत असलेले देशभरातील सुमारे ४५० संत—महात्म्यांच्या उपस्थित होणार आहे. यात महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतील 40 संत—महात्म्यांचाही समावेश आहे. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात हा कार्यक्रम […]