Kalyan Loksabha I कल्याण लोकसभेत विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर

डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Kalyan Loksabha
Kalyan loksabha

यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे निरीक्षक म्हणून गणेश जाधव, कल्याण पूर्व विधानसभा निरीक्षक म्हणून वामन म्हात्रे, उल्हासनगर विधानसभा निरीक्षक म्हणून प्रभुनाथ भोईर आणि अंबरनाथ विधानसभेचे निरीक्षक म्हणून सुनील वायले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात समन्वयाची, प्रचाराची जबाबदारी या निरीक्षकांवर असणार आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *