Karad ST Bus I कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरळीत करण्यासाठी जन आंदोलन उभारणार निवास थोरात

कुलदीप मोहिते कराड

कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवेबाबत चर्चा केली.

कराड : मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले,; त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसान सुद्धा प्रचंड झाले आहे.

याबाबत आज कराड आगारामध्ये प्रमुखांची कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष भेट घेऊन बससेवेच्या अडचणींबाबत निवेदन देऊन चर्चा केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, सातारा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे कराड उत्तर अध्यक्ष दत्तात्रय काशीद, किसान काँग्रेसचे कराड तालुका अध्यक्ष उमेश मोहिते, वाहगावचे सरपंच संग्राम पवार, सेवादल काँग्रेसचे सचिन पाटील, वसंत पाटील, विक्रम चव्हाण, सुरेश पाटील, विशाल मोहिते, शहानुर देसाई, दादासाहेब मोहिते, साजिद मुल्ला, अजित जाधव यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Karad ST Bus
Karad ST Bus

यावेळी निवेदन देताना निवासराव थोरात म्हणाले कि, येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेज सुरु होणार आहेत. मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना बससेवेच्या असुविधेबाबत अडचणींचा सामना करावा लागला होता.

त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरळीत व्हावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होणार नाही. यासाठी कराड तालुक्यातील विशेषतः कराड उत्तरमधील पाल, उंब्रज, मसूर व कोपर्डे हवेली या परिसरातील ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांसाठी बसचे व्यवस्थापन येत्या दोन ते तीन दिवसात करून याबाबत सूचना द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या न्याय मागणीसाठी काँग्रेस पक्ष जनआंदोलन उभे करेल व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कायम तत्पर राहील.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *