रायगड म्हसळयात मित्राचा दगाफटका, मित्रानेच केला मित्राचा घात म्हसळा तालुका हादरला

रायगड म्हसळयात मित्राचा दगाफटका,

Satara Mhasla news

विवाहीत तरूण मित्राची केली गोळ्या घालून हत्या ! तालुका हादरला.

मयत निलेश ढवळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खाजगी वाहन चालक.

आरोपीने शवाला दगड बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न.

 

निवडणूक आचासंहिता,पोलिसांनी हत्यार जप्त केले असताना आरोपीकडे बंदुक आली कुठुन ?

 

रायगड -म्हसळा सुशील यादव

 

म्हसळा तालुक्यात मित्रालाच बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्यात आले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनेचे वृत्त दिनांक ३० रोजी सायंकाळी उशिरा समजताच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.तल्लख बुद्धीचा आणि हरहुन्नरी असलेला विवाहीत तरूण निलेश ढवळे वय वर्षे ३४ हा मौजे मांदाटणे गावाचा रहिवासी आसुन तो रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती बबन मनवे यांच्या गाडीचा खाजगी चालक होता.दिनांक २८ मे २०२४ रोजी निलेश ढवळे घरातुन बाहेर गेला तो दोन दिवस परत आला नाही म्हणून नीलेशच्या पत्नीने म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.म्हसळा पोलिसांना संशय बळवल्याने त्यांनी निलेशच्या मित्रांची चौकशी केली असता वांगणी येथील निलेशचा मित्र अक्षय गोलांबारे वय वर्षे २८ याने निलेशला बंदुकीच्या गोळ्या झाडून खून केला असल्याचे उघड झाले आहे.अक्षय याने खुनाचा गुन्हा कबूल केला असुन त्याने नीलेशला संपवल्या नंतर पुरावा नष्ट करण्याचे हेतुने मयत निलेशचा शव दगडाने बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकले असल्याचे सांगण्यात आले.पाण्याचा डोह मोठा असल्याने दिनांक ३१ मे २०२४ रोजी दुपारी उशिरा पर्यंत नीलेशचा शव सापडला नव्हता.अखेर म्हसळा श्रीवर्धन आणि कोलाड येथील रेस्कु टीमने अथक प्रयत्न केला असता निलेशचा शव बाहेर काढण्यास मदत झाली.निलेश याचा शोध घेताना घटनास्थळी पोलिसांना निलेशचे कपडे आणि ४ जिवंत काडतुसे सापडली असल्याचे संगण्यात आले.

मयत निलेश ढवळे याची बंदुकीने गोळ्या घालून हत्या केली असल्याने अधिक माहितीसाठी त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले असल्याचे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.महेश मेहता यांनी माहिती देताना सांगितले.

निवडणूक आचार संहिता असताना आरोपी अक्षय गोलांबरे याच्याकडे जिवंत काडतुसे आणि बंदुक आली कुठुन याचा तपास पोलीस घेत आहेत.

आरोपी अक्षय याने त्याचा मयत मित्र निलेशला गोळ्या घालून का संपवले हा गहन प्रश्न पोलीसांना शोध घेताना जिक्रीचा होणार आहे.

पोलिसांनी आरोपी अक्षय गोलांबरे याला ताब्यात घेतले असून मयत निलेश ढवळे याचा शव दुपारी उशिरा सापडल्याने म्हसळा पोलिसांचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *