Reliance Union I रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा बेणसेत जल्लोष अधिकारी, कामगार वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव 

 

 

रायगड (धम्मशील सावंत)

रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोठणे टाऊन शिप वसाहत आणि बेणसे येथे जल्लोष केला.

या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये १) श्री के. टी शिर्के २) श्री गणपत पाटील,३) श्री वैभव जवके , ४) श्री राजेंद्र कुमार दलाल ५) श्री दत्तात्रय शेळके ,६) श्री अशोक भोय , ७) श्री राजा लवटे आदींचा समावेश आहे.

कामगार वर्गाच्या हितासाठी कायम कार्यरत असणाऱ्या विजयी उमेदवारांनी यापुढेही कामगारांचे हित जोपासण्याची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सर्व विजयी उमेदवारांचे कामगार नेते साधुराम मालुसरे, कामगार नेते दीपक भाई रानवडे, कामगार नेते श्री चवरकर, उदय दिवेकर, संजयभाई काकडे आदींसह अधिकारी वर्ग व कामगारांनी अभिनंदन केले.

यावेळी कामगार एक जुटीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. दरम्यान कामगार नेते अशोक भाई भोय यांच्या बेणसे येथील निवासस्थानी भेट घेऊन विजयी उमेदवारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *