Satara Accident I म्हसळा कणघर येथे स्विप्ट कारला जोरदार अपघात, तीन जण जागीच ठार तर एक जखमी 

 

मृतात ५ वर्षाच्या मुलाचा समावेश,६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

 

म्हसळा – सुशील यादव

 

गोरेगाव श्रीवर्धन राज्य मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत हमरस्त्यावर गोरेगाव कडून

म्हसळा कडे येत असताना स्विप्ट चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन तीन जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात गाडी चालक मोहम्मद रफीक शेख अंदाजे वय ३४ वर्षे रा.म्हसळा,कृष्णा हरिशचंद्र कांबळे वय ४५ वर्षे,रा.मेंददी कोंड,मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख वय वर्षे ५ हे जागीच ठार झाले असून मोहमद याचा ६ वर्षाचा मोठा मुलगा ईसा महमद शेख गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

Satara Accident
Satara Accident

त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.२३ जुन रोजी सायंकाळी पावने पाच वाजताचे सुमारास अपघाती वाहन क्रमांक एमएच -०६- ए.एन.२२२३ स्विफ्ट गाडीचा म्हसळा कणघर येथे अपघात झाल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले असता सदरची गाडी म्हसळा येथील असल्याचे समजताच एकच हाहाकार उडाला.

अपघाताची माहिती मिळताच स्वयंसेवी नागरीक आणि पोलीसांनी गाडीत अडकलेल्याना बाहेर काढून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.घटना स्थळी अपघाताची तीव्रता पहाता प्रत्यक्ष दर्शी गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी चालक मोहम्मद याचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याचा सहकारी कृष्णा कांबळे आणि त्याच्या मुलगा मुसा याचा कर्दनकाळ ठरला आहे.

अपघात प्रकरणी म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी गतीने मदतकार्य सुरू करून पंचनामा व तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *