Sunil Tatkare I भावी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुनिल तटकरेंच्या रूपाने कोकणाच्या विकासाची चाके अधिक गतीने फिरतील

शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास

सुनिल तटकरे केंद्रात मंत्री होऊन कोकणाच्या विकासाला प्रचंड चालना देतील- प्रकाशभाऊ देसाई यांचा विश्वास,

जनतेने सुनिल तटकरे यांच्या रूपाने विकासाला कौल दिला- प्रकाशभाऊ देसाई,

रायगड .(धम्मशील सावंत)रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना जनतेने विकासाच्या मुद्द्याला प्रथम प्राधान्य देत भरभरून मतांनी निवडून देऊन संसदेत नेतृत्व करण्यास पुन्हा एकदा संधी दिली. जनतेने सुनिल तटकरे यांच्या रूपाने विकासाला कौल दिला आहे.

सुनिल तटकरे यांच्यासारख्या अभ्यासू,सक्षम, आणि अफाट विकासदृष्टी असलेल्या नेत्याला केंद्रीय मंत्री पदाची संधी नक्की मिळेल, येत्या काळात भारत सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होऊन मिळालेल्या संधीचे सोने करून ते कोकणाच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाला भरभरून चालना देतील असा भरभक्कम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई यांनी व्यक्त केला.

याचबरोबर कोकणातील महायुती संघटनात्मक दृष्ट्या आता भक्कम होईलच, याहीपुढे रायगड कोकणातील विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात जिंकल्या जातील असेही देसाई म्हणाले. सुनिल तटकरेंच्या रूपाने कोकणाच्या विकासाची चाके गतीने फिरतीलच, शिवाय प्रदूषण विरहित आणि पर्यावरण पूरक प्रकल्प स्थापित होऊन सुशिक्षित बेरोजगार तरुण, आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील प्राप्त होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

Sunil Tatkare
Sunil Tatkare

प्रकाश देसाई यांनी म्हटले आहे की राजकारणात कधीही कोणीही कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो हेच खरे. रायगडात असेच कालचक्र फिरले आहे, एकेकाळी सुनिल तटकरे यांच्या सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले महेंद्र दळवी, प्रकाश देसाई, राजीव साबळे यांच्यासारखे अनेक नेते , पदाधिकारी मधल्या काळात अन्य पक्षात स्थिरावले खरे, मात्र पुन्हा सारेच जण तटकरे यांच्या निर्विवाद नेतृत्वात पुन्हा महायुतीच्या माध्यमातून एकत्रित आले.

हे कालचक्र विकास या संकल्पनेला घट्ट बिलगणारे आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार योगेश कदम या चारही आमदारांनी सुनिल तटकरे यांच्या विजयासाठी अपार मेहनत घेतली, त्यांनी दिलेला शब्द पाळत आपापल्या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देऊन महायुतीचा धर्म पाळला.

आता येणारी विधानसभा निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातून लढवली जावी आणि पुन्हा महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध करणे अपेक्षित आहे. असे देसाई म्हणाले. पक्षसंघटना बलाढ्य व मजबूत कशी होईल याला आपण नेहमीच महत्व देत आलो आहोत, छोट्या मोठ्या गटबाजीला मी भीक घालत नाही असे श्री देसाई म्हणाले.

ज्याच्या मध्ये संघटनकौशल्य असते, नेतृत्व गुण असतात, त्याच्याच मागे जनमत आणि लोकमत आहे, तोच खरा पदाधिकारी आणि नेता म्हणून नावलौकिक मिळवतो. स्वयंघोषित नेता कधीच नेता होऊ शकत नाही हे या निवडणुकीत सिद्ध झाले असल्याचा टोला प्रकाश देसाई यांनी लगावला. देसाई पुढे म्हणाले की रायगड- रत्नागिरी असो अथवा रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघ असो येथील जनता सुज्ञ आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare

विकासाचा रथ कोण अधिक गतीने पुढे नेऊ शकतो याची जाणीव कोकणवासीय मतदारांना होती, त्यामुळे त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघात कोकणचे भाग्यविधाते म्हणून नावलौकिक असलेल्या सुनिल तटकरे यांना बहुमताने निवडून दिले. तसेच उदंड प्रेम महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील उमेदवार नारायण राणे यांना देखील मिळाले.

कोकण वासीयांनी महाविकास आघाडीचे अनंत गीते असो, अथवा विनायक राऊत असो , मावळचे संजोग वाघेरे असो यांना नाकारले असल्याचे महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या मताधिक्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मावळ मतदारसंघातही जनतेने महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या पारड्यात भरभरून मताधिक्य देऊन विजयी केले. महायुतीचे हे तिन्ही शिलेदार विकासाची घौडदौड अधिक जोमाने करतील असा विश्वास आहे.

येथील मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि भाजपा, रिपाइं व अन्य सहयोगी घटक पक्ष समाविष्ट असलेल्या महायुतीचेच प्राबल्य दिसून आले आहे. महायुतीचे हे शिलेदार कोकणचा सर्वंकष आणि जनतेला अपेक्षित असा विकास साधतील असा विश्वास प्रकाश देसाई यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार जनतेला न्याय देण्याची भूमिका घेत आहे. राज्य आणि केंद्रात महायुतीचे सरकार प्रस्थापित असल्याने निधीची कुठेही कमतरता भासणार नाही , आणि निधी कसा खेचून आणायचा , मागणी तसा पुरवठा करण्याचे कसब सुनिल तटकरे यांच्याकडे असल्याचे आम्ही पाहत आलो आहे असे देसाई म्हणाले.

सुनिल तटकरे आणि एकूणच तटकरे कुटुंबीयांचे रायगड आणि कोकणच्या विकासात अतुलनीय अस योगदान राहिले आहे. रायगडचे समाजकारण – राजकारण सुनिल तटकरे यांच्या नावाने सुरू होते आणि तिथूनच पुढे जाते हे कुणीही नाकारू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि कोकनवासीय यांचं जणू सख्य आहे , संकट कोकणवासीयांच्या जणू पाचवीला पूजली आहेत.

विकासाबरोबरच कोकणातील माणसावर आलेल्या नैसर्गीक आस्मानी संकटात आणि कोव्हिडं सारख्या जैविक आपत्तीच्या संकटात तटकरे कुटुंबीय कोकणी माणसासोबत धैर्याने उभे राहिलेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाचे आधारवड बनून तटकरे यांनी नेहमीच मोलाची आणि महत्वाची साथ दिली.

रायगड वासीयांचे त्यांनी कायमच पालकत्व स्वीकारले. त्याचीच फल श्रुती झाली, जनतेने त्यांच्या शिरावर खासदारकीचा सन्मानाचा मुकुट पुन्हा चढविला. आणि कोकणवासीयांची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिली. सुनिल तटकरे यांनी राज्यमंत्री मंडळात असो, खासदार म्हणून असो अथवा पक्षात मिळालेल्या प्रत्येक पदाचा त्यांनी योग्य सन्मान केला, त्या प्रत्येक पदाला उचित न्याय देताना जनहित आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत अपार जनसेवा केल्याचेच त्यांच्या सक्षम आणि कणखर नेतृत्वाने वारंवार स्पष्ट केले.

जनतेच्या मनातील खासदार म्हणून सुनिल तटकरे निवडून आले असून आपल्या प्रभावी नेतृत्वाने , बुद्धी कौशल्याने कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भरभरून निधी आणून कोकणचा कॅलिफोर्निया करण्यासाठी महत्वाची भूमीका बजावतील असा विश्वास शेवटी देसाई यांनी व्यक्त केला. आणि भावी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुनिल तटकरे यांना देसाई यांनी पुढील यशस्वि आणी दैदिप्यमान राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *