ज्ञान हे वापरल्याने वृध्दींगत होते : प्रा.डॉ. अनिल भिकाने
नागपूर दि. १ फ़ेब्रू (प्रतिनिधि : प्रवीण बागड़े)
माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो, आत्मविश्वास निर्माण होतो. ग्राम परिवर्तन हे स्मार्ट प्रकल्पाचा हेतू आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुसखींचे सबलीकरण करण्यासाठी माफसु कटिबद्ध आहे. प्रशिक्षण फक्त ज्ञान देण्यासाठी नाही तर कौशल्य विकसित करून सर्वांगीण विकास साधने साठी असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी केले. ते जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “शेळी व कुक्कुटपालन सुधारण्यासाठी पशुसखींचे कौशल्य वृद्धी प्रशिक्षण” कार्यक्रमांतर्गत ‘शेळी व परसातील कुक्कुटपालन’ या विषयावर पशुसखींचे दि. १६ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित पंधरादिवसीय निवासी प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पशुसखींचे परिवर्तन करून सबलीकरण करण्याची जबाबदारी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय हे पार पाडत आहे आणि पुढेही महाविद्यालय अश्या प्रकाराचे प्रशिक्षण पशुसखींसाठी आयोजन करून पशुसखींना प्रशिक्षित करेल असे आश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता डॉ. सोमकुंवर यांनी केले. पशुसखी ही शासन आणि पशुपालक यांना जोडणारा दुवा आहे व त्या येणाऱ्या काळात पशुपालकांना नवसंजीवनी देतील असे मत स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. कल्पना करगावकर यांनी मांडले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन तसेच प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रमात पशुसखींनी पारंपारिक नृत्य आणि गीत सादर करून आयोजकांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यातील एकूण २५ पशुसखींनी प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट झाले बद्दलचा अभिप्राय श्रीमती लक्ष्मी मदमकर यानी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ आरजू सोमकुवर होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रकल्प समन्वयक डॉ सारीपुत लांडगे तर दृकश्राव्य माध्यमातून डॉ. राजू कोलते, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग तसेच स्मार्ट प्रकल्प चे नोडल अधिकारी डॉ. कल्पना करगावकर, डॉ. निलेश खलाटे, तांत्रिक अधिकारी, (पशुसंवर्धन अमलबजावणी कक्ष), पुणे व श्री अमृत इंगळे, उपव्यवस्थापक, माविम, मुंबई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रकल्प सह समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. वैशाली बांठीया यांनी केले. तर प्रशिक्षण सहसन्वयक डॉ. दर्शना भैसारे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण सह समन्वयक डॉ. किशोर राठोड, डॉ. शाईनी जॉय, डॉ. अतुल ढोक, डॉ. सुरेश जाधव, डॉ. शिल्पश्री शिंदे, डॉ. प्रतिभा जुमडे, डॉ. गीतांजली धुमे, श्री. प्रवीण बागड़े, श्री. तुषार मेश्राम, श्री. एम. यु. गौतम व श्री. जुवार यांनी अथक परिश्रम घेतले.