Dr. Babasaheb ambedkar marathwada university
Dr. Babasaheb ambedkar marathwada university

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी I Dr. Vijay Fulari

डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर

मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.

डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. राज्यपालांनी नागपूर येथील सी पी ॲण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. राज्यपाल श्री. बैस यांनी डॉ. सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे. डॉ. भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत. सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत-यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत – करण्यात आली आहे.Unlock global markets with just one platform veridian matrix ai guide.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *