लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार -आमदार महेश शिंदे
प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा कोरेगाव या ठिकाणी संपन्न
सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा संपन्न
मिलिंदा पवार – पुसेसावळी
सकल लोहार समाज विकास मंच व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव यांच्या वतीने गुरुवार 22 फेब्रुवारी 2024 रोजी तुलाही मंगल कार्यालय एकंबे रोड कोरेगाव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी लोहार समाजाचा वधू वर मेळावा देखील झाला. तरी याप्रसंगी सर्व लोहार समाज मधील लोक उपस्थित होते अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण सर अध्यक्ष सकल लोहार समाज विकास मंच सातारा यांनी भाषण केले याप्रसंगी आमदार महेश दादा शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी भाषण केले मात्र भाषणादरम्यान विश्वकर्मा यांच्या विषयी जी माहिती महेश शिंदे यांनी सांगितली ती माहिती अगदी समाजातील मोजक्याच लोकांना माहिती होती लोहार सुतार सोनार या बारा बलुतेदारी मधील जाती कशा निर्माण झाल्या व याचा निर्माता कोण आहे व धातूशी संबंधित जाती कशा निर्माण झाल्या याबाबतीतले अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे महेश शिंदे यांनी सांगितल्यामुळे तेथे समाजातील लोकांना अजून ऐकण्याची उत्सुकता वाढली धातुयुग कधी आले आणि धातुयुग आल्यानंतर त्या धातूचे वेगवेगळे रूपांतर समाजामध्ये कसे झाले ते देखील त्यांनी अगदी छान प्रकारे समजून सांगितले मात्र जाताना त्यांनी लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार असे सांगितल्यानंतर नागरिकांमधून टाळ्यांचा आवाज आला आणि लोहार समाजाला कोरेगाव मध्ये मंदिर बांधण्यासाठी जागा मिळणार त्यामुळे समाजातील सर्व लोकांना महेश शिंदे विषयी आपुलकी वाढली आहे
श्री राजाभाऊ बर्गे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत राहुल दादा बर्गे सदस्य जिल्हा नियोजन समिती दिपाली महेश बर्गे नगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी लोहार समाजाचे उपाध्यक्ष सुरेश माने सचिव सुरेश चव्हाण याप्रकारे जिल्ह्यातील कार्यकारणी उपस्थित होते तसेच कोरेगाव तालुका कार्यकारणी मधील नवनाथ पवार वैशाली पवार अशोक माने रमेश देशमुख रमेश पवार अंकुश पवार उपस्थित होते त्याच प्रकारे वधू वर मेळावा देखील संपन्न झाला त्याचप्रकारे सगळ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले .