मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

 

मंगरूळपीर (vinod dere)

मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर प्रमूख पाहूणे वंचीतचे जिल्हा जेष्ठ नेते समाधान भगत ,वंचीतचे शंकरदादा तायडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळयाला माल्यार्पण करूनअभिवादन उपस्थितांनी केले. याप्रसंगी 40 वर्षापासुन पत्रकारीता क्षेत्रात कार्ये करणारे सुनिल भाऊ भगत यांना मूकनायक पूरस्काराने सन्मानीत करण्यांत आले. यावेळी
पत्रकार विनोद डेरे,सुधाकर चौधरी,रमेश मुंजे, प्रमोद भगत,फुलचंद भगत,अशोक राऊत, संदीप कांबळे,प्रमोद तायडे यांची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *