भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष!
:तेजसदादा जमदाडे
(कुलदीप मोहिते-सातारा)
दि.१५.,उंब्रज : भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करीत रहा भाजपासह माझी तुम्हाला कायम साथ राहिल, असा विश्वास कामगार मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजस्वीदादा जमदाडे यांनी आज येथे दिला.
‘गाव चलो अभियान’ अंतर्गत ते गावोगाव मतदारांशी संपर्क साधत होते . यावेळी त्यांनी उंब्रज मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास सहकुटुंबासहित भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी धनश्री ताई, छोटे चिरंजीव व त्यांच्या मातोश्री आल्या होत्या. त्यावेळी कराड उत्तरच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष सौं वैशालीताई मांढरे यांनी त्यांच्या कुटुंबाचे औक्षण करून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली व त्यांना मोलाचं मार्गदर्शनही केल. तसेच जाता जाता त्यांनी तुमच्या सर्व अडचणी आपण सोडवू हा शब्द दिला. तुम्ही प्रामाणिक पणे काम करत रहा,काम करत असताना एकत्र काम केल्याने सामाजिक प्रश्न जलद गतीने सुटतात.त्यामुळे तुमच्या या कार्याला माझी साथ ही कायम असेल असा शब्द त्यांनी दिला.त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी सौ.वैशालीताईंनी त्यांचे आभार मानले.