मॉनिटरगिरी करण्यात नेणवली शाळा राज्यात सर्वोत्तम, जिल्ह्यात अव्वल

 

रायगड (धम्मशील सावंत )

स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ या दुसऱ्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील शाळा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील टॉप 20 शाळांमध्ये सुधागड तालुक्यातील नेणवली शाळेची निवड झाली आहे. ही शाळा रायगड जिल्ह्यात अव्वल आली आहे.
अनेक स्वच्छता अभियान करून देखील परिसर अस्वच्छ दिसतात कारण कचऱ्याबाबत निष्काळजीपणाची सवय टिकून आहे. ही असामाजिक सवय मोडून काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना केवळ “मॉनिटरगिरी” करत निष्काळजीपणा करणाऱ्या व्यक्तीला जागीच चूक दर्शवून, त्या व्यक्तीलाच झालेली चूक दुरुस्तीसाठी विनंती करण्याची सवय होणे जरुरी आहे. ठीक ठिकाणी थांबवले गेल्याने ही असामाजिक सवय मोडून निघेल अशी प्रकल्प संचालक रोहित आर्या यांची संकल्पना आहे. PLC स्वच्छता मॉनिटर २०२३-२४ अभियानाचा प्रभावी परिणाम अनुभवल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांने ५ डिसेंबर २०२३ राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. त्याच बरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक 10 गुणांचे महत्व दिले.

 अशी केली मॉनिटगिरी 
विद्यार्थ्यांने केलेली स्वच्छता मॉनिटरगिरी, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांना जागीच थांबवण्याच्या घटनेचे अनेक अनुभव सोशल मीडिया वर शेअर करणे. या अभियानाच्या कालावधीत रजीप नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांने असंख्य वेळा कचऱ्याबाबत होणारा निष्काळजीपणा जागीच थांबवला. त्यातील सुमारे 200 अनुभवांच्या विवरणाचे व्हिडिओ शेअर केले आणि राज्यात टॉप ट्वेंटी मध्ये स्थान पटकावले. त्यामध्ये राज सोनावळे, पुजा मगर, आर्या मगर, साक्षी सोनावले, अलका वाघमारे यामध्ये सर्वाधिक राज सोनावळेने 60 अनुभव शेअर करुन मोलाचे योगदान दिले. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचे तसेच त्यांच्या मनोगताचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर अपलोड करण्याचे भरीव काम शाळा समन्वय राजेंद्र अंबिके यांनी केले. मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले. या कामगिरीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख कल्पना पाटील, गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी शाळेचे कौतुक केले. स्वच्छता मॉनिटर टप्पा-2 मध्ये नेणवली शाळा महाराष्ट्रात सर्वोतम ठरली हे सर्व श्रेय शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्वच्छता योगदानाचे आहे, याचा अभिमान वाटतो.

राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक व स्वच्छता मॉनिटर समन्वयक, शाळा नेणवली

 

उमटे धरणाचं पाणी तरुणाई पेटवणार

 

रायगड :धम्मशील सावंत

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील साचलेला गाळ काढून मुबलक प्रमाणात पिण्यायोग्य पाणी देऊन धरणाच्या बंधार्‍याची तात्काळ डागडुजी करणेबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसिलदार अलिबाग, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना सदर निवेदन दिले.
सदरच्या निवेदनात उमटे धरणाची निर्मिती 1978 साली करण्यात आली. त्यानंतर 1995 साली हे धरण जीवन प्राधिकरणाकडून रायगड जिल्हा परिषदेला हस्तांतरीत झाले. त्यामुळे धरणाची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेवर आहे. धरणाची साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफुट आहे. पाण्याची शेवटची पातळी 40 मीटर, धरणाची उंची 56.40 मीटर आहे. सद्यस्थितीत मोठया प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता सुमारे 30 दशलक्ष घनफुट आहे. धरणाच्या पाण्यावर 47 गावे व 33 आदिवासी वाडया असून पिण्याच्या पाण्यावर ही गाव अवलंबून असून हे पाणी पुरवठा करणारे एकमेव धरण आहे.
धरणाचा गाळ हा मोठया प्रमाणावर साचल्यामुळे डिसेंबर महिन्यातच पाणी कपातीला सुरुवात होते. धरणावर अवलंबून असणार्‍या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघषर्र् करावा लागत आहे. उमटे धरणाचा गाठ काढून मुबलक प्रमाणात पाणी देण्याची जबाबदारी ही शासनाचीच असताना शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मागच्या सन 2021 च्या पावसाळयामध्ये कोरोना काळामध्ये उमटे धरणाच्या फिल्टर प्लांटमध्ये एक आदिवासी बांधव पडून मरण पावला त्याचे प्रेत पिल्टर प्लांटमध्ये आठ दिवस कुजून पडले होते. आणि तेच कुजलेले दुषित पाणी आठ दिवस लोकांना पाजण्याचे पाप रायगड जिल्हा पाणी पुरवठा विभागाने केले आहे. उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नागरिक, महिला आता शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पाव़ित्र्यात आहेत.
पाणी पुरवठा अधिकारी या नात्याने आपण गाळ, काढण्याच्या बाबतीत जिल्हा पाणीपुरवठा विभाग, तसेच जिल्हापरिषदेला आदेश दयावेत तसेच शासनाचे तज्ञ इंजिनियर यांचे मार्गदर्शनाखाली धरणाचा गाळ काढण्यात यावा तसेच सदरचा गाळ काढण्यासाठी आपण तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा. उमटे धरणाचा मागील 46 वर्षापासून गाळच काढलेला नाही. सदरचा गाळ काढून आपण नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी देण्याची नैतिक जबाबदारी आपण घ्यावी. उमटे धरणाच्या पाण्याचा आणि गाळाचा प्रश्न सुटला नाही तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले 44 गावातील आणि 33 आदिवासी वाडयांतील नागरिक, महिला शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे पत्र उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
शासनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा
उमटेे धरणाचा गाळ व मुबलक पिण्यायोग्य पाणी देण्याच्या बाबतीत रा. जि. प. व लघुपाठ बंधारे विभाग अपयशी ठरला आहे. सदरच्या गाळाच्या संदर्भात प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर 47 गावे व 33 आदिवासी वाड्यांतील नागरिक शासनाच्या विरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शासनाने पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. – अ‍ॅड. राकेश पाटील,उमटे धरण संघर्ष ग्रुप,
पाण्याचा प्रश्न समजावा 
धरणाच्या गावाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गावपातळीवर लोकांचे प्रबोधन करत असून शासनाने पाण्याचा प्रश्न हा माणसांचा प्रश्न म्हणून समजून तात्काळ गाळ काढून शासन तत्पर आहे याची पोच पावती द्यावी. – नंदेश गावंड
धरणाचे पक्के काम करण्यात यावे 
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील एकमेव धरण उमटे हे आज शेवटी घटका मोजतेयं. धरणाच्या भिंतीची परिस्थिती अतिशय दयनिय झाली असून त्याचे दगड निखळले आहेत. त्यामुळे सदर मातीच्या बंधार्‍याला जवळ जवळ 50 हून अधिक ठिकाणी भगदाडे पडली असून धरण पुर्ण भरल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा होत आहे. धरणाचा बंधारा मातीचा असल्यामुळे तो कधी फुटेल याचा नेम नाही. असे झाल्यास विभागांतील सहा गावे पुर्णपणे पाण्याखाली जातील. धरण गावाने पुर्णपणे भरलेले असून आज गेली 40 वर्षे गाळ काढलेला नाही. पाण्याची क्षमता अत्यंत कमी झाल्यामुळे 5 ते 7 दिवसाआड पाणी पुरवले जात आहे तेही दुर्गंधीयुक्त. धिम्म प्रशासन गली 8 वर्षे त्यांच्या नजरेत आणून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे व येथील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. लोक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
– अ‍ॅड. मधुकर वाजंत्री,सल्लागार

 

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत
रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.

               यावेळी अनंत गिते म्हणाले की भाजप कडून देशात विकासाचा केवळ भ्रम नर्मिाण केला जातं आहे. वास्तव वेगळं आहे. जाहिरात बाजी करून देशातील जनतेची फसवणूक केली जातं आहे. जनतेला मोफत धान्य देण्याची घोषणा केली जातं आहे. मोफत अन्नधान्य हा मोहजाळ आहे, जनतेला मोह दाखवला जातो, जस उंदराला खाद्य दाखवून लालच दाखवून पिंजऱ्यात अडकवलं जातं, सापळा रचला जातो तसाच हा सापळा सुरु आहे. देशातील 80 कोटी जनता दार्र्यिय रेषेखाली आहे,अन्नासाठी मौताद आहे. आणि म्हणे वश्विगुरु असा टोला अनंत गीतेंनी मोदींना लगावला. लोकशाहीत मतदान हा सर्वश्रेष्ठ आणि मौलिक अधिकार आहे,मतदान विकू नका, आता काही जण पैशाच्या जोरावर मते विकत घेण्याचा प्रयत्न करतील असे सांगत गाढवाची किंमत 60 हजार, माणसाची किंमत किती,तर फक्त 2000 रुपये का, असे सांगत अनंत गीतेंनी यावेळी गाढवाची भन्नाट गोष्ट सांगितली.यावेळी सुभाष देसाई म्हणाले की 2024 ची लोकसभा निवडणूक भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा एक डाग ही ज्यांच्यावर नाही असा स्वच्छ चर्र्यियाचा लोकप्रतिनिधी संसदेत पाठवा. यावेळी देसाई यांनी सुनिल तटकरे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. उल्का महाजन म्हणाल्या की देश विघातक वळणावर पोहचला आहे. आदिवासी बांधवांच्या जमीन, जंगल, जल या हक्क अधिकारावर भाजपने गदा आणली आहे. आपल्याला जगणे मुश्किल होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते लोकशाहीच्या बाजूने निवडणूक रिंगणात आहेत. आपल्याला सन्मानाने जगायचे असेल तर इंडिया आघाडीची सत्ता आली पाहिजे. लोकशाही , संविधान आणि आपले हक्क अधिकार वाचवायचे असतील तर भाजप प्रणित कोणतेही उमेदवार असतील त्या उमेदवाराला , पर्यायाने भाजपला तडीपार करा असे आवाहन या सभेत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अनंत गीते,उल्काताई महाजन, शिवसेना रायगड जल्हिाध्यक्ष अनिल नवगणे, आदींसह पदाधिकारी, मान्यवर, आदिवासी बांधव उपस्थित होते.

 


		 	

वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.

 

रायगड (धम्मशील सावंत)

 वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा ​​काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक काळजी घ्यावी. योग्य पशुआहार, मुरघासचा वापर, निकृष्ट चाऱ्यावर यूरिया प्रक्रिया करून सुद्धा लवकरात लवकर दुग्ध उत्पादन घडवणे शक्य आहे.

जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषध पाजावे, प्राणी नियमितपणे लाला खुरकुत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंतरविषार इतर रोगप्रतिबंधक लसीकरण करून. पशुखाद्या मिठाईचा वापर करून व इलेक्ट्रोलाइटचा योग्य उत्पादन वापरावे. तसेच दुधा पशूंना निरोगी पशुहार या खनिजे जोडेआळत. चाऱ्यामध्ये बदल करणे.पक्षांच्या घरट्यामध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था. मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा तलाव, सार्वजनिक ठिकाणापासून दूर आणि संरक्षित आणि तेथे संबंध आवश्यक माहितीचा फलक या वनस्पती. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभाग देण्यात आली आहे. उष्माघातापासून होणारे पशुधनाचे नुकसान सज्ज रायगड पशुसंवर्धन विभाग आहे. पशुसंवर्धन विकास विकास निर्देशक सूचना निर्गमित केल्या आहेत, कृपया त्याचे पशुपालकांनी एकत्रितपणे सर्व उष्माघात केला. तरीसुद्धा एक जरी अशी बाब घडून लोक तात्काळ नजीकच्या तालुका लघु पशुवैद्य किंवा सर्व चिकित्सालय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ व श्रेणी २ यांना संपर्क करून बाधित जीवनात उपचार करून उपचार करावेत.

डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड, अलिबाग

कुल पशुधन व कोंबड्या

२० वी पशुगणना – रायगड
गाय – १,७६,०६
म्हैस – ६२,२२५
मेंढी – २,२०३
शेळी – ०,१८८
डुक्कर – ५१३
बदक – १४७२
कुक्कुट पक्षी – ४०२४५२३

परिणाम 
उष्मा चौकाने प्राणघातक परिणाम होणार नाही

१. पाणी पिण्याकडे कल
२. कोरडा चारा न खाणे
३. विदर्भ मंदावणे
४. सावलीकडे स्थिर करणे
५. शरीराचे तापमान वाढ
६.जोरात श्वास
७. समूह घाम
८. उत्पादनात कमी
९. प्रजनन क्षमता कमी होणे
१०. रोगप्रतिकार शक्ती कमी

 पशूंची घ्यावयची आवश्यक काळजी

 • > जनावरांना शक्यतो व ऊन कमी असताना चर सोडावे.
  > पूरक पूरक सुधारित गोठे बांधावेत गोट्याची ऊंची जास्त जास्त गोटात हवा खेळती.
  > चारला शक्यतो पांढरा चुना / रंग लावावा. तसेच टाकलापाचोळा / तूराट्या / पाचट टाकावे. फक्त सूर्याची किरणावरती होण्यास मदत होईल.
  > संपूर्ण थंड राहण्यासाठी गोट्याच्या सभोवतली झाडे लावावीत. मुक्त संचाराचा अवलंब. गोठया वातावरण थंड राहण्यासाठी आपले फवारे, प्रिंकल या स्थानिक पंख्याचा वापर करा.
  > दुपारच्या वातावरणास गोतात्याच्या हवाचू बारदाणे, शेडनेट
  लावावेत आणि आपण त्यांना शक्यतो भिजवा, सर्व उष्ण गोवेत बरोबर नाही आणि आतील थंड देश. जनावरांना मुबलक थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.

बैल चौकोन मशागत हंगामात काम नको

बैल शेतकऱ्यांची मशागतीची शक्यता कमी पडते. त्यांना पाणी जास्त उपलब्ध होईल. आवश्यकतेनुसार आवश्यकतेनुसार मिठाचा वापर.

म्हसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना सरकार मानवंदनेची परंपरा निरंतर – सुनील तटकरे

 

म्हसळा – घागडा

भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि मनोकामना पूर्ण म्हैसळा ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांच्या यात्रोत्सवात या वर्षात पासुन देण्यात आलेली शासकिय मानवंदनाची परंपरा या वर्षपूर्ती सिमित न राहाता शांती यांनी सुनिल तटकरे मानवंदना कार्यक्रमाचे स्वागत केले. मी निस्सी भक्त आहे.ग्राम दैवत धावीर महाराजांना राज्य अशी मानवंदनावी म्हैसळा ग्रामस्थ मंडळाची अपेक्षा होती. अपेक्षा चैत्रोत्सव ग्राम दैवतांच्या पाल सोहळ्यातील सांगता समारंभातगड पोलिस दला राज्य सरकार मानवंदना देण्यात आली.

ऐतिहासिक आनंद सोहळ्यांचा मी निवडून मानकलो आहे. श्री धावीरदेव पालखी सोहळेत मंदिरा पालखीच्या पाच मारेकऱ्यांची प्रथा परंपरा बघाबला स्वतःला भाविक उत्स्फूर्त ग्रामस्फूर्त प्रतिसाद आणि आनंद द्विगुण असल्याचे मला समाधान वाटत असल्याचे सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना गाव दैवत धावीरदेव महाराजांचे कृपा लाभले. ,भराटी श्री देवाला साकडे धावा.कार्यक्रम आयोजक म्हैसळा हिंदू ग्रामस्थ मंडळाने सुनिल तटकरे ग्रामदैवत, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ यथोचित सन्मान केला. त्यांचे समवेत मंत्री अदिती तटकरे,नगराध्यक्ष संजय कर्मचार्य,माजी अधिकारी महादेव पाटील, समीरकर, ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आणि भाविक भक्त मोठ्याने उपस्थित होते. स्वागत हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार विलकर, अधिकारी सुशील यादव, जेष्ठ समाजसेवक सुनील उमरोट यांनी केले. सचिव सुशील यादव यांनी आभार प्रदर्शन करताना सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नात विशेष जादु आहे उशिर अहवाल त्यांच्या प्रयत्नाने आज म्हसळा ग्राम दैवत श्री धावरला आज यात्रोत्सवात राज्य मानवंदना प्रभु हाग्धशर्करा योग आहे.इतिहासात ही निरीक्षणे लक्षात ठेवावीत. विकासाच्या माध्यमातून 

जसे प्रेम चौधरी सुनिल तटकरे यांनी वासियांवर केले आहे तसेच त्यांना योग्य देतील अशी ग्वाही मनोभावे आभारी आहे. शासकिय मानवंदना दिली.ग्रामदैवताला मानवंदना देतखीग्रामस्थांचे पुण्यपालचा मान श्री धावीर देवाचे मानकरी म्हशिलकर परिवार यांना आला होता.

शासन निर्णयानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना मिळणार पोलिसांकडून मानवंदना.

 

म्हसळा – प्रतिनिधी रायगड

म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या,सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री. धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री धावीर देव महाराजांना रायगड पोलिसांची मानवंदना देण्यासाठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने  गतवर्षी साजरा होणारा श्री धावीरदेव महाराजांचा चैत्र पौर्णिमा उत्सव हा म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळासाठी ऐतेहासिक ठरणारा आहे.

या वर्षापासून महाराष्ट्र राज्य शासनाचे आदेशानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना दिली जाणार असल्याने म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचा आनंद द्विगुणित झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक वर्षांची म्हसळा ग्रामस्थ मंडळाने शासनस्तरावर केलेली मागणी चैत्र पौर्णिमा उत्सवात ग्राम दैवत धाविरदेव महाराजांच्या यात्रेत पुर्ण होत असल्याने म्हसळा हिंदु ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष आभार मानून त्यांना मनोमन धन्यवाद दिले आहेत.मागील सहा महिन्यांपासुन म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर,सचिव सुशिल यादव आणि कार्यकारणी मंडळाने राज्य शासनस्तरावर जसे रायगड जिल्ह्यात रोहा,महाड,पाली, पोलादपूर येथील प्राचीन काळापासुन प्रसिद्ध असलेले आणि भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवतांना पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना दिली जाते तशीच मानवंदना म्हसळा येथील ग्राम दैवत श्री धावीर देव महाराजांना देण्यात यावी अशी मागणी केली होती.म्हसळा ग्रामस्थांची

सदरची मागणी व मनोमन इच्छा खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने पुर्ण होणार असल्याने सन २०२४ मधील म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचा चैत्र पौर्णिमेचा उत्सव शासस्तरावर इतिहासात नोंद होणारा आहे.चैत्र पौर्णिमेला दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता धाविरदेव मंदिराचे भव्य प्रांगणात पालखी सोहळ्याचे सांगता समारंभात म्हसळा ग्राम दैवत असणाऱ्या श्री धाविरदेव महाराजांना रायगड पोलिस दलाकडून शासकीय मानवंदना दिली जाणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर निमंत्रण ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशिल यादव यांनी दिले आहे.