म्हसळा – प्रतिनिधी रायगड
म्हसळा शहर आणि परिसरातील वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या,सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री. धाविरदेव महाराजांचा यात्रोत्सव सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या प्रसंगी श्री धावीर देव महाराजांना रायगड पोलिसांची मानवंदना देण्यासाठीचा शासन मंजुरी मिळाली असल्याने गतवर्षी साजरा होणारा श्री धावीरदेव महाराजांचा चैत्र पौर्णिमा उत्सव हा म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळासाठी ऐतेहासिक ठरणारा आहे.
या वर्षापासून महाराष्ट्र राज्य शासनाचे आदेशानुसार ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराजांना रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना दिली जाणार असल्याने म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचा आनंद द्विगुणित झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक वर्षांची म्हसळा ग्रामस्थ मंडळाने शासनस्तरावर केलेली मागणी चैत्र पौर्णिमा उत्सवात ग्राम दैवत धाविरदेव महाराजांच्या यात्रेत पुर्ण होत असल्याने म्हसळा हिंदु ग्रामस्थांनी खासदार सुनिल तटकरे यांचे विशेष आभार मानून त्यांना मनोमन धन्यवाद दिले आहेत.मागील सहा महिन्यांपासुन म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर,सचिव सुशिल यादव आणि कार्यकारणी मंडळाने राज्य शासनस्तरावर जसे रायगड जिल्ह्यात रोहा,महाड,पाली, पोलादपूर येथील प्राचीन काळापासुन प्रसिद्ध असलेले आणि भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवतांना पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना दिली जाते तशीच मानवंदना म्हसळा येथील ग्राम दैवत श्री धावीर देव महाराजांना देण्यात यावी अशी मागणी केली होती.म्हसळा ग्रामस्थांची
सदरची मागणी व मनोमन इच्छा खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नाने पुर्ण होणार असल्याने सन २०२४ मधील म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळाचा चैत्र पौर्णिमेचा उत्सव शासस्तरावर इतिहासात नोंद होणारा आहे.चैत्र पौर्णिमेला दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता धाविरदेव मंदिराचे भव्य प्रांगणात पालखी सोहळ्याचे सांगता समारंभात म्हसळा ग्राम दैवत असणाऱ्या श्री धाविरदेव महाराजांना रायगड पोलिस दलाकडून शासकीय मानवंदना दिली जाणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे जाहीर निमंत्रण ग्रामस्थ मंडळाचे सचिव सुशिल यादव यांनी दिले आहे.