रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य […]
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख […]