Shahu Maharaj I पालीवाला महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने आरक्षणाचे जनक,सामाजिक समतेचे प्रणेते , लोक कल्याणकारी राजा राजषीॅ छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी 

 

रायगड (धम्मशील सावंत )

सुधागड एज्यूकेशन सोसायटीचे शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज याची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी आय क्यू ये सी. चे समन्वयक डॉ. एम. ए. बडगुजर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, भागवत धर्माच्या झेंड्याखाली निरनिराळ्या जातीजमातींना एकत्र आणण्याचे महान कार्य संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार इ. सर्व जातीतील संतांनी केले.

आणि जातिभेद मोडण्याचे, नाहीसे करण्याचे तेच महान कार्य कायदा व कृतीद्वारे राजर्षी शाहू महाराजांनी केले. आजच्या तरुणांनी व विद्यार्थ्यांनी शाहू महाराजाचे कार्य अवगत करून वाटचाल करावी असे अध्यक्षीय भाषणात डॉ. बडगुजर यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. एस व्ही. पाथरकर यांनी शाहू महाराजांच्या कार्याचे विवेचन करताना सांगितले कि, महाराजांनी अस्पृश्यता निवारण, मोफत व सक्तीचे शिक्षण, विद्यार्थी वसतिगृहाची अभूतपूर्व योजना, धरणे बांधून हरितक्रांतीचे वाटचाल, मल्लविद्या व मर्दानी खेळास दिलेले उत्तेजन, चित्र, संगीत, नाट्य, आदी ललीत कलांना व कलावंताना दिलेले आश्रय, रंगभूमीच्या विकासार्थ केलेले प्रयत्न, रशियन राज्यक्रांती च्या प्राश्वभूमीवर संघटनात्मक कार्यासाठी कामगारांना दिलेली चालना, पदललितांना अन्यायविरुद्ध न्याय मिळवून देणारा राजा या विविध क्षेत्रातील शाहूरायांचे कार्य पाहता समजते. तसेच अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अनिल झेंडे, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. एस. ए. पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय इ. क्षेत्रातील विविध विधायक कार्यांचे विवेचन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी वनस्पती विभागाचे प्रमुख प्रा. यू. बी. इनामदार, इतिहास विभागाचे प्रा. डॉ. एम. ए. सोहनी, भौतिकशास्त्र विभागाच्या प्रा. विशाखा मानकामे, अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. दीपाली बांगारे, प्रा. भक्ती साजेकर , वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा. कृष्णा जांबेकर व आभार प्रा. संतोष भोईर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *