author

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघ शाखेला भेट हा ऐतिहासिक क्षण – मा. खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड

नांदेड | विशेष प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेली भेट हा भारतीय सामाजिक व वैचारिक इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार, सुप्रीम कोर्टचे ज्येष्ठ वकील तथा प्राध्यापक प्रा. डॉ. ॲड. सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी केले. २ जानेवारी १९४० रोजी कराड […]

जागावाटपात नाराज, भाजप नेते आठवलेंच्या दारात

जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाची नाराजी जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निरोप घेवुन प्रविण दरेकर यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची होणार बैठक मुंबई दि. 30 – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागा वाटपात भाजप महायुतीने रिपब्लिकन पक्षावर अन्याय केला असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या नाराजीचे वृत्त […]

तुकाराम मुंडे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले तर… लोकशाहीचा खरा कस लागेल!

प्रवीण बागड़े नागपूर , मो.क्र. ९९२३६२०९१९ भारतीय लोकशाही ही केवळ मतपेटीपुरती मर्यादित नसून ती मूल्यांवर उभी असलेली व्यवस्था आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र वास्तवात हीच लोकशाही आज अनेक प्रश्नांनी ग्रासलेली दिसते. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो, पण अलीकडच्या काळात हा उत्सव कमी आणि तमाशा अधिक झाला आहे. पैशांची उधळण, जाती-धर्माचे ध्रुवीकरण, सत्तेचा गैरवापर, […]

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय […]

देवघरातील देव : शिवराज पाटील चाकूरकर

स्मृती, संस्कार आणि संसदीय कार्याचा भावस्पर्शी दस्तऐवज   लातूर (विशेष प्रतिनिधी) राजकारणाच्या गजबजाटातही माणुसकी, संस्कार आणि नात्यांची ऊब जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वावर लिहिलेले “देवघरातील देव : शिवराज पाटील चाकूरकर” हे पुस्तक आज अत्यंत भावनिक आणि सुसंस्कृत वातावरणात प्रकाशित झाले. देवघर या पवित्र आणि स्मृतिमय स्थळी, भाजपा नेत्या व लातूर महानगरपालिका निवडणूक प्रभारी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर तसेच […]

खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार

मुंबई-२९-(प्रतिनिधी)- मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे. (Chandrashekhar Azad Bhim Army) समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील पदाधिका-यांना दिले आहेत. त्यांच्या आदेशानंतर आजाद समाज पार्टीच्या पदाधिका-यांनी प्रदेश स्तरावर हर्षवर्धन सपकाळ यांची तर मुंबई […]

Salman Khan चा ६० वा वाढदिवस: बॉलीवूडच्या भाईजानचं भव्य सेलिब्रेशन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई | मनोरंजन प्रतिनिधी बॉलीवूडचा सुपरस्टार, ‘भाईजान’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान आज आपला ६० वा वाढदिवस (Salman Khan 60th Birthday) साजरा करत आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेल्या सलमान खानने बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपली अधिराज्य गाजवली आहे. त्यांच्या या खास दिवशी देश-विदेशातून चाहत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडताना दिसत आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची […]

हिवाळ्यात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी कशी घ्यावी? | Winter Health Care Tips

हिवाळ्याचा ऋतू सुरू होताच थंडी, कोरडे हवामान आणि तापमानातील बदल यांचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. विशेषतः लहान मुलं (Kids) आणि ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) यांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असल्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. या लेखात हिवाळ्यात त्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती देत आहोत. हिवाळ्यात आरोग्याच्या सामान्य समस्या हिवाळ्यात पुढील […]

सोने आणि चांदी सध्या विकत घ्यावी का? | Gold Silver Investment 2026 मध्ये योग्य वेळ आहे का?

मुंबई | लोकशासन फायनान्स महागाई, जागतिक युद्धसदृश परिस्थिती, शेअर बाजारातील चढ-उतार आणि व्याजदरातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सोने (Gold) आणि चांदी (Silver) कडे वळताना दिसत आहेत. मात्र अनेक गुंतवणूकदारांचा एकच प्रश्न आहे. “सध्या सोने आणि चांदी खरेदी करणे योग्य आहे का?” या लेखात आपण सोन्या-चांदीचे सध्याचे ट्रेंड, भविष्यातील शक्यता, फायदे-तोटे आणि गुंतवणुकीसाठी योग्य रणनीती सविस्तरपणे […]

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा? निवडणूक इतिहास, वॉर्ड, आरक्षण ते 2017 निकाल

मुंबई | लोकशासन न्यूज मुंबई महानगरपालिकेची (BMC – Brihanmumbai Municipal Corporation) निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्तास्पर्धा आहे. सुमारे ₹50,000 कोटींहून अधिक वार्षिक बजेट, शहराचा कारभार, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था यामुळे BMC निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. BMC Election 2026 […]