आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

 

गणेश शिंगाडे गडचिरोली 

 

आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० तिन लाख छ्यानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पीलीस स्टेशन आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मंडल करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशासन चिंता , अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी एम. रमेश ., उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे , यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल., महिला पोलीस उपनिरिक्षक जगताप पोलीस शिपाई राउत, पोलीस शिपाई मेंदाळे, चालक पोलीस उपनिरीक्षक येनगंटीवार. यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *