उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली.

 

गड्चिली: गणेश शिंगाडेमोर्शी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाष्टी – आलापल्ली महामार्गावरून खाली उतरलेली आकडी येथील चौकीतून खाली येत असलेल्या ट्रकला सुरजागड लोहखनिज कच्चा मालबाहेर ट्रकने जोरदार धडक दिली. हि आज ६.३० च्या घटना घडली. या दोन्ही ट्रक चालक सुखरूप मला माहीती आहे की ट्रक क्रमांक एच ३३ टी६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापली जात होता व ट्रक एम एच ३४बी झेड ३९७ हा ट्रक सुरजागड लोहखनिजाच्या कच्च्या मालसेलला येत होता या महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. आष्टी ट्रक चालकाने त्यांच्या सुसाट वेगानं आपल्या वाहनातून गाडी उचलून ठेवली तरी ट्रकला सुरजागडकडून लोहखनिज वाहनाने मालाची ताकद पकडली. असे प्रत्यक्षदर्शी सांगितले, दोन्ही ट्रकचे नुकसान झाले आहे

या आष्टी विजयी घटना घडली आहे. या मार्गावर सूरजागड लोहखनि कच्चा मालाची जागा ट्रका मोठ्या सुसाट जीवंत धावत असतात या महामार्गावर तर धारकांना मुठीत घेऊन प्रवास करत असतात या मार्गावर नेहमीच असतात आजपर्यंत अनेक जीव गेले आहेत तरी कोणत्याही प्रकारची सुरजागड लोहगडाच्या कच्च्या मालाची गाडी येत नाही. वाहन चालक हे कोणाच्या बापाला आवश्यक नाही असे नागरिक सामान्य बोलल्या जात आहेत येथील ग्रामीण भागातील एका रक्षकाची सुरक्षा आहे तरीही याठिकाणी रक्षकांची नेमणूक अशी आबादी जनसामान्यांतून जात आहे.

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई. तीन लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

 

गणेश शिंगाडे गडचिरोली 

 

आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची एम.एच ३४ ए.व्हि २१३६ हे वाहन संशयित रित्या फिरतांना दिसुन आल्याने त्यास थांबवुन त्याची दोन पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ९० एम.एल मापाच्या ९६,०००/-रुपयाची देशी दारु व ०३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकुण ३,९६,००० तिन लाख छ्यानव हजार रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुध्द पीलीस स्टेशन आष्टी अप क्र.५२/२०२४ कलम ६५ (अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मंडल करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशासन चिंता , अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी एम. रमेश ., उपविभागीय पोलीस अधिकारी कोकाटे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काळे , यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मंडल., महिला पोलीस उपनिरिक्षक जगताप पोलीस शिपाई राउत, पोलीस शिपाई मेंदाळे, चालक पोलीस उपनिरीक्षक येनगंटीवार. यांनी पार पाडली आहे.

Gadchiroli News : चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर 

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले.

     अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्क मान्य) अधिनियम २००६, हा कायदा लागू होवून १७-१८ वर्षे झाली आहेत.महाराष्ट्रामध्ये त्याची अनेक जिल्ह्यात अंमलबजावणी झाली.विशेषत: विदर्भात मोठ्या प्रमाणात व प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.

     CPC संस्था नागपूर यांच्या प्रयत्नाने मौजा चौडमपल्लीचे कंपार्टमेंट नं. एकूण ९ एकूण क्षेत्र- आराजी-१७६९.०५४ हे.आर वनभुमी, मौजा सिंगनपल्लीचे कंपार्टमेंट नं.एकून ५ एकूण क्षेत्र-११९३.९४ हे.आर वनभुमी व चपराळाचे कंपार्टमेंट नं.एकून ७ एकूण क्षेत्र-१२२८.३६५ हे.आर वनभुमी जागेचा सामुहिक वन हक्क दावा SDM कार्यालय चामोर्शी येथे सादर करण्यात आला.

       सदर प्रक्रियेत अजिंक्य ऊके,चिंतामन बालमवार,सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव संस्था नागपूर यांचे तांत्रिक मार्गदर्शन वसंत बारसागडे ग्रामसेवक चौडमपल्ली यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.

    सामुहिक वन हक्क दावा सादर करताना साईनाथजी गुरनुले- अध्यक्ष वन हक्क समिती चपराळा,दयानाथजी कोकेरवार-उपसरपंच चपराळा,सखारामजी कन्नाके- अध्यक्ष वन हक्क समिती चौडमपल्ली,मारोतीजी गेडाम – सचिव वन हक्क समिती चौडमपल्ली,मारोतीजी कन्नाके-अध्यक्ष वन हक्क समिती सिंगनपल्ली,विश्वनाथ गावडे सचिव वन हक्क समिती सिंगनपल्ली व पदाधिकारी उपस्थित होते.

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक

 

गणेश शिंगाडे गडचिरोली 

 

काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस 12 कि.मी. अंतरावर असलेल्या महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील भुमकन गावाजवळ तळ ठोकुन आहे. 

त्यावरुन अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे 08 पथक व सीआरपीएफ चे 01 क्युएटी सह सदर जंगल परिसरात तात्काळ माओवाद विरोधी अभियान सुरु करण्यात आले. सदर जंगल परिसरात शोध मोहिम सुरु असतांना माओवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारास अभियान पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. काल रात्री 18.00 वा., 23.30 वा आणि आज पहाटे 04.30 वा. च्या अंधारात गोळीबार सुरुच होता. सदर चकमकीमध्ये माओवादयांनी अभियान पथकावर बीजीएल (एक्रख्र्) मारा केला. परंतु अभियान पथकाने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. अभियान पथकाचा वढता दबाव पाहुन अंधाराचा फायदा घेवुन माओवादी घटनास्थळावरुन पळून गेले.

आज सकाळी सुर्योदया बरोबर घटनास्थळावर शोध मोहिम राबविण्यात आली. यात मोठया प्रमाणावर माओवादी सामान, साहित्य, वायर, जिलेटीन स्टीक्स, बॅटरी, सोलर पॅनल ई. साहित्य जप्त करण्यात आले. सदर जंगल परिसरात माओवाद विरोधी अभियान सुरु आहे.   

सदर अभियानामध्ये सहभागी जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतूक केले असून, सदर परिसरात माओवादीविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन

 

गणेश शिंगाडे गडचिरोली

श्री प्रशिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे दिनांक ३० जानेवारी 2024 रोजी मंगळवारला १३ व्या स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्‌घाटक आर. एस. बालापूरकर सर कमांडंट अधिकारी 9 बी एन सी.आर.पी.एफ प्राणहिता कॅम्प अहेरी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सैदाणे सर, तह‌सिलदार अहेरी, कालबांधे सर पोलिस निरीक्षक अहेरी, गणेश शिंगाडे मुख्याध्यापक तसेच शाळेचे प्राचार्य उपस्थित होते. शाळेतर्फे घेण्यात आलेल्या अहेरी जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण या प्रसंगी करण्यात आले. या स्पर्धेत जमा केलेल्या प्रवेश शुल्काची एकूण रक्कम दिव्यांग वि‌द्यालय, बोरी या शाळेला टी. व्ही., फ्री डिश आणि वि‌द्याथ्यांसाठी टी-शर्ट या स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान शालेय वि‌द्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे चार हजार हुन अधिक प्रेक्षकानी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास दागाम तसेच कु.ज्योती गोदारी यांनी केले बक्षीस समारंभाचे प्रास्ताविक लोकेश दुर्गे यांनी कार्यक्रमाचे आभार शाळेचे प्राचार्य राजेश रामगिरवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशवस्वतेसाठी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.