Eco friendly lifestyle I पर्यावरणस्नेही जीवनशैली, केळीच्या झाडापासून बनवले दोर डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय

 

पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत )
अलिबाग तालुक्यातील चौल येथील शैलेश राईलकर पर्यावरण स्नेही (इकोफ्रेंडली) जीवन पद्धती जगत आहेत. त्यांनी प्रयोग व शोध याद्वारे विविध इकोफ्रेंडली वस्तू तयार केल्या आहेत. तसेच प्लास्टिकला पर्याय दिला आहे.

नुकतेच त्यांनी केळीच्या झाडापासून दोर बनवले आहेत. तसेच डस्टबिन बॅगला राखेचा पर्याय देऊन जणू राखाडीची डास्टबिन बॅग बनवली आहे. सतीश राईलकर विजेवर चालणारी कोणतीही यंत्रसामग्री न वापरता केळीच्या खोडापासून धागा निर्मिती करून त्यापासून दोरी बनवली आहे. .
यासाठी प्रथम केळीच्या खोडाचे काप केले. त्यानंतर त्या खोडाचे सर्व पापुद्रे वेगवेगळे करून या पापूद्र्यांवरती दाब देऊन त्यातील रस पाणी काढून टाकाले. नंतर हे पापुद्रे दोरी वरती उन्हात वाळत टाकून चांगले सुकवून घेतले.

शैलेश राईलकर यांनी केळीच्या झाडापासून बनवलेली दोरी.(छाया :धम्मशील सावंत, पाली बेणसे )

सुकल्यानंतर या धाग्याची वेणी करून त्याचा दोरखंड बनविला. असे दोरखंड ग्रामीण भागातील शेतकरी आणि बागायतदारांना वापरता येऊ शकतात. यापासून कलात्मक वस्तूंची निर्मिती ही करता येऊ शकते. या दोरखंडांना चांगली मजबुती असते. भाताचे भारे बांधणे, गोणी बांधणे, अशाप्रकारे याचा वापर करता येतो. घरच्या घरी अशा दोऱ्या बनविल्यास बाजारातील दोऱ्या विकत घेण्याचा खर्च वाचू शकतो.
ग्रामीण भागात कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करता येईल या विषयावर काम करताना राईलकर यांना राखेच्या पिशवीचा शोध लागला. घरी आलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे करायचे काय ? जाळल्या तर हवा खराब होते. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे मातीतही टाकता येत नाहीत. मग जाणीवपूर्वक वेगळ्या ठेवून त्या पुनर्निर्मितीसाठी पाठविणे हा एकच उपाय त्यांना सापडला. त्याचबरोबर प्लास्टिक पिशवीचा वापर कुठे कुठे टाळता येईल आणि त्यावर उपाय काय यावर विचार करता करता ही राखेची पिशवी बनविण्याचे त्यांना सुचले.

Eco friendly lifestyle
शैलेश राईलकर यांनी बनवलेली राखेची डस्टबिन बॅग. (छाया :धम्मशील सावंत, पाली बेणसे )

ग्रामीण भागात बऱ्याचशा शेतकरी बागायतदारांकडे घराभोवताली स्वतःची पुरेशी जागा उपलब्ध असते. अशा ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या घरात निर्माण होणारा ओला कचरा त्याच्याच जागेत जिरविता येऊ शकतो. अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा किंवा डम्पिंग ग्राउंड कडे जाणारा कचरा थोपाविता येऊ शकतो. कचरा डस्टबिन मध्ये टाकण्यासाठी बाजारात मिळणारी काळी प्लास्टिकची पिशवी टाळण्यासाठी ही राखेच्या पिशवीची कल्पना सुचली. त्याचबरोबर जमणाऱ्या इतर प्लास्टिकच्या पिशव्या जाणीवपूर्वक वेगळ्या ठेवून पुढे पुनर्निर्मितीसाठी पाठविता येऊ शकतात.

 

Eco Friendly lifestyle
Eco Friendly lifestyle

मोठी समस्या
प्रत्येकजण आपल्या घराच्या कचऱ्याच्या डब्यात काळी प्लास्टिकची पिशवी लावत असतो. आणि पिशवी सकट उचलून तो कचरा आपण घंटागाडीत टाकतो. त्यामुळे आपला कचऱ्याचा डबा स्वच्छ राहतो खरा परंतु पर्यावरणामध्ये आपण एक प्लास्टिकची पिशवी रोज टाकत असतो. पुढे हा कचरा डम्पिंग ग्राउंड कडे जातो. डम्पिंग ग्राउंड मध्ये अशा लाखो पिशव्यांमधून कचरा आल्याने हा ओला कचरा सडू लागतो. यातील प्लास्टिक वेगळे करणे अशक्य असते. आणि कर्मचाऱ्यांच्या अजाणतेपणामुळे शेवटी हा कचरा जाळला जातो. अशा प्रकारे आपल्या देशातील हजारो लाखो डम्पिंग ग्राउंड मध्ये याच पद्धतीने कचरा जाळल्याने आपल्या आजूबाजूची एकंदरच पृथ्वीवरची शुद्ध हवा खराब होत चालली आहे. त्यामुळे या डस्टबिन बॅगला पर्यायस्नेही पर्याय देणे गरजेचे होते.

 

मग याला पर्याय काय?
यावर विचार करताना शैलेश राईलकर यांच्या असे लक्षात आले की जर डंपिंग ग्राउंड कडे जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करता आले आणि प्लास्टिक ला वेगवेगळे पर्याय शोधता आले तर ही समस्या आपण काही अंशी कमी करू शकतो. आज ग्रामीण भागात बऱ्याच लोकांच्या घराच्या आजूबाजूला स्वतःची पुरेशी जागा उपलब्ध असते. या जागेत खड्डा करून ओला कचरा जिरवता येऊ शकतो. प्रत्येकाच्या घरीच जर प्लास्टिक जाणीवपूर्वक वेगळे ठेवले गेले तर ते डम्पिंग ग्राउंड कडे जाणारच नाही. असे जमणारे प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठवायला आज अनेक संस्था काम करत आहेत. राईलकर यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे की घंटागाडीला द्यायला कचराच नाही. कारण ते ओला कचरा त्यांच्याच जागेत जिरवतात. सर्व प्रकारचे प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी पाठवितात. राखेची कचरा पिशवी हा त्याचाच एक भाग आहे. असे राईलकर म्हणाले.

 

अशी बनते राखेची डस्टबिन बॅग
कचऱ्याची बादली ओलसर करून त्यात राख आतून सर्वत्र लावावे. ज्यामुळे त्याला एक प्रकारचे राखेचे कोटिंग तयार होते. म्हणजे एक प्रकारे ही कचरा बादलीत लावण्याची पिशवीच तयार होते. यातील कचरा घंटा गाडीत देता येतो किंवा जवळच्या खड्ड्यात टाकता येतो. यामुळे प्लास्टिक थैली टाळली जाते. ही राख स्वतःच्या घरातील चुली मधून गावातील इतर ठिकाणावरून आणली जाते व साठवली जाते गरजेनुसार तिचा वापर केला जातो.

 

व्यवस्थापन
कचरा काय पद्धतीचा आहे त्यावर अवलंबून आहे. जेव्हा जास्त ओला कचरा असेल तेव्हा धुतलेली चांगली. अन्यथा प्रत्येक वेळी धुवायलाच हवी असे नाही. इथे पाण्याचीही बचत करायला हवी. कचरा पिशवीला पर्याय म्हणून राखेची पिशवी म्हटल्यामुळे लोक त्याचा वापर करतील. कचऱ्याची बादली भरेपर्यंत. प्रत्येकाकडे बादलीची साईज वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाकडे कचरा निर्माण होण्याचे प्रमाणही वेगवेगळे असू शकते. कोणाची एक दिवसात तर कोणाची कचरा बादली भरायला चार दिवसही लागतील. बादली भरेपर्यंत राख चिकटलेली राहते. बादली मोठी असेल तर थोडा थोडा कचरा टाकल्यावर प्रत्येक वेळी त्याला राखीने झाकता येते. पिशवी प्रमाणेच कचऱ्यावर झाकण म्हणूनही राखेचा उपयोग होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *