Ramdas Athawale I महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट

रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

Ramdas Athawale
Ramdas Athawale

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी तिसऱ्यांदा निवड झाल्या नंतर रामदास आठवले आज पहिल्यांदाच इंदूर ला आले असता त्यांनी महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.

Ramdas Athawale
Ramdas Athawale

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पद मला मिळाले ते केवळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मिळाले आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार आहोत.

Ramdas Athawale
Ramdas Athawale

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी छोट्या छोट्या रिपब्लिकन आंबेडकरी संघटना पक्ष आणि गटांनी रिपब्लीकन पक्षात विलीन व्हावे.

Ramdas Athawale
Ramdas Athawale

तरुणांनी नवनवे रिपब्लिकन गट निर्माण करण्या पेक्षा रिपब्लिकन पक्षात विलीन होऊन रिपब्लिकन ऐक्याची ताकद उभी करावी आणि माहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले यांचे इंदोर विमानतळ येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *