रायगडात प्रशांत भोजने यांचा ठिकठिकाणी सत्कार आणी कौतुक सोहळा
रायगड . (धम्मशील सावंत )यूपीएसी परीक्षेचा अभ्यास करीत असताना तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर समजा सुधारक महापुरुषांचे वाचन करुन अभ्यास करण्याची एकाग्रता व आवड निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजने यांनी केले. सुधागड तालुक्यासह रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील विविध भागात भोजने यांचा सत्कार केला जातं आहे. आणि कौतुक सोहळा पार पडतोय . येथील ग्रामपंचायत वाघोशी व आदर्श नगर भेरव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशांत भोजने म्हणाले, जीवनात काही बनायचं असेल तर फक्त दहावी, बारावी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत मर्यादित राहू नका तर त्यापुढे शिका एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा द्या त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालत असलेली बार्टी ही संस्था आपल्याला स्कॉलरशिप देते त्याचा फायदा घेण्याचे आवाहन देखील प्रशांत भोजने यांनी केले.
ठाणे येथील नागसेन नगर सारख्या कामगार वसाहतीत राहून यूपीएससी परीक्षा प्रशांत भोजने यांनी उत्तीर्ण करुन आई वडिलांचे स्वप्न साकार केले. यासाठी प्रशांतने नऊ वर्ष मेहनत घेऊन तासनतास अभ्यास केला. त्यामुळे यूपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले.
