माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दुध प्या दिर्घायुषी व्हा !!!
या दुध जागृती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन
नागपुर : प्रतिनिधी : प्रविण बागडे
दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती असून दुधाचे मानवी आरोग्याचे दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.
विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जागतीक दुध दिवसाचे औचित्य साधून आयोजित दुध जागरुकता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, अभियानाचे संयोजक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने व मुख्य वक्ते तथा अधिष्ठाता दुग्धतंत्रज्ञान डॉ. प्रशांत वासनिक उपस्थित होते.

प्रास्तविक पर भाषणात या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संयोजक तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. भिकाने यांनी दुध प्या दिर्घायुषी व्हा ! या टॅग लाईन खाली राज्यभर दुध जागरुकता अभियान हे पुढील वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या अभियानाचा मुख्य उद्देश अलिकडील काळात दुधाबद्दल लोकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दुर करून तसेच फास्ट फुडकडे वळलेल्या तरुणाईस दुधाचे महत्व सांगून राज्यात दुधाचे सेवन वाढण्यासाठी जागरुकता निर्माण करणे असल्याचे सांगीतले.
राज्यात दर डोई दुधाचे सेवन हे ३२९ ग्रॅम असून देशाच्या सरासरी ४५९ ग्रम पेक्षा खूप कमी असल्याचे सांगीतले. दुधाचे सेवन वाढले तर दुध दर वाढीस चालना मिळून दुध उत्पादन वाढीस चालना मिळून शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.
