Konkan Graduate constituency I कोकण पदवीधर मतदारसंघात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उमेदवार निवडून येणारच- प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांचा विश्वास

 

कोकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत, प्रस्थापित उमेदवारांना बहुजन विद्यार्थी संघटनेचे ऍड शैलेश वाघमारे यांचे तगडे आव्हान

विजय आमचाच होणार, बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास

नागोठण्यात ऍड शैलेश वाघमारे यांच्या प्रचारार्थ विजयी परिवर्तन मेळावा

रायगड(धम्मशील सावंत )- कोकण पदवीधर मतदार संघात यंदा मोठी चुरसपूर्ण लढत होण्याची चिन्ह दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांपुढे बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते ऍड : शैलेश वाघमारे यांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात परिवर्तन वादी विचारांचे उच्च शिक्षित उमेदवार ऍड शैलेश वाघमारे ताकतीने उतरले आहेत.

त्यामुळे कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र पहावयास मिळतेय. वाघमारे यांना सुशिक्षित मतदार वर्गातून मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय. बहुजन विद्यार्थी संघटना आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी च्या वतीने बहुजनांचे प्रातिनिधीक अपक्ष उमेदवार ऍड शैलेश अशोक वाघमारे निवडणूक लढवीत आहेत.

नागोठण्यात बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनील वाणी तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार ऍड शैलेश वाघमारे यांच्या प्रचारार्थ विजयी परिवर्तन मेळावा पार पडला. या मेळाव्यात निवडणूक प्रचाराची रणनीती ठरवून आपला उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

Konkan Graduate constituency
Konkan Graduate constituency

यावेळी उमेदवार वाघमारे यांनी शैक्षणिक दर्जा सुधारला जावा तसेच गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी वर्गातील घटकांना चांगले शिक्षण मिळावे, सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या पात्रता आणि कौशल्यानुसार रोजगार मिळावा यासह विविध सामाजिक प्रश्नावर काम करणार असल्याचे adv शैलेश वाघमारे यांनी सांगितले.

तर बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्यध्यक्ष अनिल वाणी यांनी सांगितले की बहुजन विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळात जाऊन विद्यार्थी, कष्टकरी, श्रमजीवी कामगार वर्गाच्या प्रश्नावर अविरतपणे कार्यरत आहे. आजवर पदवीधर मतदार संघात आंबेडकरी बहुजन विचारांच्या पक्षांना कोकणात उमेदवार देणे शक्य झाले नाही ते धाडस बहुजन विद्यार्थी संघटनेने केले आहे.

बहुजन विद्यार्थी संघटना आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडीने उच्च शिक्षित उमेदवार adv शैलेश वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.कोकण हा आंबेडकरी विचारसरणी मानणाऱ्या वर्गाचा बालेकिल्ला असून कोकणात पदवीधर मतदारसंघात आंबेडकरी विचारांचा उमेदवार निवडून येणारच असा विश्वास व्यक्त केला. कोकणात वाघमारे यांच्या उमेदवारीला मोठी पसंती असल्याने यंदा परिवर्तन होऊन विधिमंडळात बहुजनांचा आवाज बुलंद होणार असल्याचे अनील वाणी यांनी सांगितले.

Adv प्रकाश कांबळे यांनी प्रास्ताविकात कोकणातील सुशिक्षित मतदारांची आकडेवारीचे गणित मांडत आपला उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले. तर आभार प्रशिक बिनेदार यांनी मानले. यावेळी भगवान बिणेदार, किसन शिर्के आदींनी पाठिंबा दिला. यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्य पदाधिकारी, रायगड जिल्हा पदाधिकारी,सभासद तसेच बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *